mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गावा गावांमध्ये झालेली विकास कामे पुस्तिकेच्या माध्यमातून समोर; आवताडे यांनी 3 हजार कोटीं निधीचा हिशोब दिला जनतेला; फिर एक बार समाधानदादाच आमदार नागरिकांनी दिल्या घोषणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 17, 2024
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
नागरिकांनो! विकास कामांच्या जोरावरच मला आणखी एक संधी द्या, मतदारसंघाच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत मी कटिबद्ध; आमदार समाधान आवताडेंचे जनतेला आवाहन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मतदारसंघातील जनतेच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मतदारसंघांमध्ये आलेल्या हजारो कोटी निधीवर टिकात्मक भाष्य करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता या निवडणुकीमध्ये निश्चितपणे त्यांची जागा दाखवून देईल असे प्रतिपादन भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी प्रचारसभा दौऱ्यादरम्यान केले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आमदार समाधाना आवताडे यांनी भाजपा व महायुती पदाधिकाऱ्यांसमवेत मंगळवेढा तालुक्यातील नंदुर शिवणगी, जित्ती, भोसे, आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी, गोणेवाडी या गावांमध्ये प्रचार दौरा करून ग्रामस्थ मतदारांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करण्याची अवघी ३ वर्षांची संधी मिळाली. परंतु अतिशय अल्पकाळामध्ये मिळालेल्या संधीचे सोने करत आपण मतदारसंघातील सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी खेचून आणला.

सदर निधी प्राप्त झाल्यामुळे मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षपणे गेल्या अनेक वर्षांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागून अनेक विकास कामे पूर्ण होऊन विकासाच्या व प्रगतीच्या माध्यमातून मतदार संघामध्ये परिवर्तनाचे मोठे चित्र दिसत असताना केवळ आपले राजकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी व जनतेची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांनी या विकास निधीवर केवळ टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू केला आहे.

परंतु मतदारांच्या समोर मतदार संघातील विविध गावांमध्ये झालेली कामे विकास पुस्तिकेच्या माध्यमातून समोर असल्यामुळे त्यांच्या टीकेला कोणीही महत्त्व न देता मला मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देतील असेही आमदार आवताडे यांनी सांगितले.

येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या आशीर्वादाने मला ५ वर्षांचा पूर्ण कालावधी मिळणार असल्यामुळे त्या कालखंडात मतदार संघामध्ये एकही विकासाचे काम शिल्लक ठेवणार नसल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पार पडलेल्या या प्रचार दौऱ्यामध्ये विविध गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विविध विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करून पुन्हा आमदार आवताडे यांच्या हातीच लोकप्रतिनिधीच्या रूपाने या मतदारसंघाच्या चाव्या देणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.

या प्रचार दौऱ्या दरम्यान भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध गावांचे सरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे उमेदवार

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 15, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
Next Post
वाहनधारकांनो! मंगळवेढा-सोलापूर रोडवरील टोल नाका सुरू; ‘या’ नागरिकांना मिळणार मासिक पास

मोठी बातमी! आता 'या' लोकांना लागणार नाही टोल टॅक्स; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 15, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..