टीम मंगळवेढा टाईम्स ।
अनैतिक संबंधाच्या कारणावरून तुषार सुरज धनवडे (वय25 दत्तात्रय, रा.वाटंबरे ) याचा खून केल्याप्रकरणी दत्तात्रय शिंदे ( रा . गोणेवाडी ) याला पोलिसांनी तात्काळ गजाआड केले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील मयत तुषार सुरज धनवडे याचे अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. यापुर्वी मुलीच्या नातेवाईकांनी सदर मयतास संबंध तोडणेबाबत समज दिली होती.
मात्र तो त्याकडे दुर्लक्ष करून प्रेमसंबंध ठेवत असल्याने नातेवाईक आरोपी दत्तात्रय शिंदे याने चिडून दि. २ जूनच्या सकाळी ७.१५ पुर्वी तो रहात असलेल्या घरापासून काही अंतरावर मयताच्या डोक्यात धारदार हत्याराने व पोटात मारून जीवे ठार मारल्याची फिर्याद एका मयताचे वडिलांनी दिली आहे.
दरम्यान दि .१ जून रोजी फिर्यादीच्या भावकीतील लग्न असल्याने मयत हा पाटखळ येथे लग्नाला आला होता.
रात्री उशीर झाल्याने तो घराकडे परतला नाही . सकाळी वाटंबरेचे पोलिस पाटील पांडुरंग पवार यांनी मयताच्या वडिलास बोलावून सांगितले की गोणेवाडी हद्दीत तुमच्या मुलाचा खून झाला आहे.
तदनंतर मयताचे वडील व कुटुंबातील सदस्य सदर ठिकाणी गेले असता आरोपी यांचे घराजवळ काही अंतरावर नांगरट केलेल्या शेतात मयत तुषार याचे प्रेत पडलेले नजरेस आले.
त्याच्या डोकीत मोठी जखम झालेली व नाकातोंडातून रक्त आलेले मयताच्या वडिलांना दिसून आले.
मंगळवेढा पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल होताच पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते , अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून शिरशी येथील जंगलात लपून बसलेला खूनी आरोपी यास पकडण्यात त्यांना यश आले आहे.
सदर आरोपीनी अनैतिक संबंधाच्या कारणावरून खून केल्याचे कबूल केल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज