टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुणेच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या तृतीय वर्षाचे बनावट गुणपत्रिकेचा आधार घेत मुख्याध्यापकाची पदोन्नती घेऊन 1 लाख 43 हजार 76 रुपयांची शासनाची व संस्थेची फसवणूक
केल्याप्रकरणी तीन हजार रुपये दंड व एक वर्ष कैद अशी शिक्षा न्यायाधीश जी.एम चरणकर यांनी सुनावली.
या प्रकरणाची फिर्याद मंगळवेढा येथील श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ या संस्थेचे सचिव काशीनाथ पाथरवट यांनी दिली.
सदर संस्थेच्या वतीने 5 शाळा चालवल्या जात असून त्यामधील करमाळा येथे जगदंबा कमलादेवी मूकबधिर मुलांची निवासी शाळा चालविण्यात येत असून
त्या शाळेमध्ये चक्रधर विश्वनाथ पाटील यांची 1999 पासून शिक्षक म्हणून नियुक्ती केली 2004 झाली या शाळेमध्ये मुख्याध्यापक पद रिक्त झाल्याने शासनाने पदवीधर शिक्षकांमधून
हे पद भरण्यात भरण्याच्या सूचना दिल्यानंतर चक्रधर पाटील यांनी पदोन्नतीसाठी आवश्यक असलेले आरसीआय प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला,
डीसई प्रमाणपत्र व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणेचे मे 2000 सालच्या तृतीय वर्षाच्या गुणपत्रित्राची सत्यप्रत जोडली.
त्यानुसार मुख्याध्यापक पदावर 2004 साली पदोन्नती देण्यात आली मात्र त्यानंतर वरील कागदपत्राबाबत संस्थेचे सचिव काशिनाथ पाथरूट यांना संशय आल्यामुळे सदर प्रमाणपत्राच्या मुख्य प्रतीचे तोंडी व लेखी मागणी केली असता सदर शिक्षकाने दिली नाही.
यावर संस्थेने टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडे पडताळणीसाठी अर्ज देऊन माहिती घेतली असता सदरचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे विद्यापीठाने कळविल्यानंतर सदर मुख्याध्यापक म्हणून काम करताना
दि.27 जानेवारी 2004 ते 7 मार्च 2007 या कालावधीतील मुख्याध्यापक श्रेणीचा पगार 1 लाख 43 हजार 76 रुपये उचलून शासनाची व संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी सचिव पाथरूड यांनी
सदर शिक्षकावर 420, 468, 471 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याचा निकाल न्यायालयाने तीन वेगवेगळ्या कलमानुसार प्रत्येकी एक हजार रू. दंड व एक वर्षे शिक्षा दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज