टीम मंगळवेढा टाईम्स ।
अर्जुन पाईप उद्योगसमूहाचे प्रमुख दत्तात्रय भुसे यांना सोलापूर सोशल फाउंडेशनचा ‘श्रीमंती सोलापूरची’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. त्याचे औचित्य साधून सोलापूर सोशल फाउंडेशन तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना श्रीमंती सोलापूरची या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.
मंगळवेढा येथील युवा उद्योजक दत्तात्रय भुसे यांनी तरुणांना एक आदर्श निर्माण करून दिला आहे. ग्रामीण भागातून त्यांनी आपल्या अर्जुन पाईप उद्योगाची सुरुवात केली आहे.
अर्जुन पाईप उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी अनेक बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळवून दिले आहे.
आजपर्यंत त्यांनी गुणवत्ता पूर्ण पाईपची निर्मिती करून शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्यांनी मोठे स्थान निर्माण केले आहे.
‘6 मे’ ला पुरस्कार वितरण सोहळा
हा पुरस्कार सोहळा 6 मे रोजी मंगळवेढा येथे होणार आहे. कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सोलापूर सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज