mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अपेक्षांचे टेक ऑफ..! सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक क्षण; आजपासून गोव्यासाठी विमानसेवा सुरू; मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची हजेरी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 9, 2025
in सोलापूर
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

चौदा वर्षे १० महिन्यांची दीर्घ प्रतीक्षा संपली. आज, सोमवार, ९ जून २०२५ रोजी सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून पुन्हा एकदा प्रवासी विमानसेवेला प्रारंभ होत आहे.

वास्तवात सप्टेंबर १९४८ मध्ये भारतीय सेनादलाने मराठवाडा मुक्तिसंग्राम प्रसंगी हैदराबादच्या निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी होटगी रोड येथील विमानतळाची निर्मिती केली होती. त्यानंतर अडगळीत पडलेल्या या विमानतळाची पुनर्बांधणी तब्बल ३७ वर्षांनी, म्हणजे १९८४ मध्ये करण्यात आली.

पुढे २५ वर्षे काहीच झाले नाही. फेब्रुवारी २००९ मध्ये सोलापूर- मुंबई प्रवासी विमानसेवा आठवड्यातील चार दिवस याप्रमाणे सुरू झाली, ती अल्पजीवी ठरली. ऑगस्ट २०१० मध्ये ही सेवा बंद पडली. या १८ महिन्यांत १३५८ विदेशी पर्यटक सोलापुरात आले, देशांतर्गत पर्यटक वेगळे.

सोलापुरात नेत्यांची विमाने ये-जा करीत राहिली. शेजारील अनेक छोट्या शहरांसाठी विमानसेवा सुरू झाली. पण, सोलापूरला सातत्याने डावलले गेले. याची सल सोलापूरकरांना बोचत राहिली. दुसऱ्या बाजूला, गेल्या दोन दशकांत सोलापूरचा कायापालट झाला.

जिल्ह्यातून जाणारे सर्व महामार्ग अनेक पदरी झाले. तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट या श्रद्धाकेंद्रांना जोडणारे मार्ग अविश्वसनीयरीत्या बदलले. महामार्गांवरील दुभाजकांत शोभेची सुंदर झाडे, वेली डोलू लागल्या.

महामार्गांच्या दोन्ही बाजूस देशी वृक्षांची लागवड झाली. रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण झाले. स्थानकाचा विस्तार झाला. अनेक सुधारणा झाल्या. एकेकाळी अस्वच्छता हीच ओळख बनलेले रूळ बायोटॉयलेटमुळे टप्प्याटप्प्याने स्वच्छ बनले. दळणवळणातील या प्रगतीसोबतच सोलापूरने अनेक क्षेत्रांत क्रांती केली.

स्मार्ट सिटीसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेत सोलापूरचा समावेश झाला. ज्याची आम्ही कधी कल्पनाच केली नाही, अशा अनेक गोष्टी प्रत्यक्षात उतरल्या. शेती उत्पादन आणि बाजारपेठेत सोलापूरने झेप घेतली. कांदा बाजारपेठेत सोलापूरने देशात कीर्तिमान स्थापित केला.

केळी, डाळिंब, बेदाणा, ऊस उत्पादनात झेंडा रोवला. गारमेंट क्षेत्र असो की शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र असो की बांधकाम, सोलापूर मागे राहिला नाही. प्रगतीच्या या महामार्गात एकच गतिरोधक होता – एअर कनेक्टिव्हिटीचा अभाव; तो आता दूर होत आहे, हे सुचिन्ह म्हटले पाहिजे.

प्रवासी विमानसेवेसाठी झालेला विलंब एका अर्थाने आपल्या पथ्यावरच पडला, असे म्हटले पाहिजे. कारण, या निमित्ताने का होईना आम्ही सोलापूरकर एक दिशेने विचार करू लागलो. विकासाच्या मुद्द्यावर पुढे आलो.

सामान्य माणसाच्या आकांक्षांकडे धोरणकर्ते दीर्घकाळ दुर्लक्ष करू शकत नाहीत, हेही सिद्ध झाले. लोकांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे राज्यकर्ते भेटतात, हे सत्य आहे. मोठा विचार करणे आणि आपण आपली पात्रता वाढवत राहणे, हेच यशाचे गमक आहे, हा विचार अंगी बाणवू तर उद्याची सकाळ आपल्या सर्वांसाठी शुभ आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज विमानसेवेचे उद्घाटन; मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज विमानसेवेचे उ‌द्घाटन होणार आहे. सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी होटगी रोड विमानतळाच्या प्रांगणात उद्घाटन समारंभ होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाच प्रवाशांना बोर्डिंग पास मिळणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री हिरवा झेंडा दाखवतील. १० वाजून ३० मिनिटांनी विमान गोव्याकडे उड्डाण करील.

सकाळी ७:४५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून सोलापूरकडे रवाना होतील. साडेआठ वाजता सोलापूर विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानसेवेचा उद्घाटन कार्यक्रम कार्यक्रम होईल. तो साडेदहापर्यंत सुरू राहील.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आसरा चौकातील एका हॉटेलमध्ये मराठी पत्रकार संघाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार कार्यक्रम नियोजित आहे.

याप्रसंगी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, आदींची उपस्थिती राहणार आहे. पुरस्कार कार्यक्रम संपल्यानंतर ११ वाजून ५० मिनिटांनी ते विमानाने मुंबईकडे रवाना होतील.

केंद्रीय विमान नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे सकाळी नऊ वाजता सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे. आज सकाळी साडेनऊ वाजता विमानसेवा उद्घाटन कार्यक्रमाला ते हजेरी लावतील.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर विमानतळ उद्घाटन

संबंधित बातम्या

गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी बातमी! यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी, पंढरपूर पालखी मार्गावर टोल नाही; टोलमाफीचे स्टिकर्स मिळवण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय?

June 17, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शाळेचा पहिलाच दिवस ठरला शेवटचा… भावाला आणताना ट्रकची दुचाकीला धडक, बहिण-भावाचा मृत्यू; कुटुंब लोटले दुःखाच्या खाईत

June 17, 2025
मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

June 16, 2025
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

सोलापूर जिल्ह्यात मध्यरात्री थरार! पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरमध्ये मध्यरात्री एन्काऊंटर

June 15, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

आषाढीसाठी ‘पंढरीच्या वारी’त येणाऱ्या दिंड्यांना मिळणार प्रत्येकी ‘एवढे’ हजार रुपये; वारकऱ्यांसाठी राबवला जाणार ‘हा’ उपक्रम; शासन आदेश निघाला

June 15, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

कामाची बातमी! प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार पालिका निवडणुका ‘या’ महिन्यानंतरच

June 15, 2025
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

गोव्याहून आलेल्या विमानाच्या सोलापुरात लैंडिंगपूर्वी 3 घिरट्या, प्रवाशांची घालमेल; विमान कंपनीने सांगितले ‘हे’ कारण

June 14, 2025
अर्थकारण! मंगळवेढ्यातील ‘AD फायनान्स’चा आज चौथा वर्धापनदिन सोहळा; 3 हजारांपेक्षा जास्त ग्राहकांची 154 कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर; सर्व लोन जलद सुविधा एकाच छताखाली

अर्थकारण! मंगळवेढ्यातील ‘AD फायनान्स’चा आज चौथा वर्धापनदिन सोहळा; 3 हजारांपेक्षा जास्त ग्राहकांची 154 कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर; सर्व लोन जलद सुविधा एकाच छताखाली

June 14, 2025
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

लंडनमधली मुलाची भेट अधुरी राहिली, अहमदाबादमध्येच घात झाला; सांगोलच्या ‘या’ वृद्ध दाम्पत्याचा करुण शेवट

June 13, 2025
Next Post
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

पोलिसांना आवाहन! मंगळवेढ्यात एकाच रात्रीत दोन घरफोड्या; दागिन्यांसह २ लाख ८० हजारांचा ऐवज पळवला; हज यात्रेचे स्वप्न हे अधुरेच राहिले

ताज्या बातम्या

गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी बातमी! यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी, पंढरपूर पालखी मार्गावर टोल नाही; टोलमाफीचे स्टिकर्स मिळवण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय?

June 17, 2025
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

काय सांगता..! फक्त ‘इतक्या’ रुपयांचा चेक बाऊन्स झाला तरी तुरुंगवास? जाणून घ्या काय आहे कायदा…

June 17, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

भयानक! ऑनलाइन रम्मीचा डाव संपूर्ण कुटुंबाच्या जीवावर बेतला; कर्जबाजारीपणातून तरुणाने पत्नीसह पोटच्या गोळ्याला संपवले; तीन वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह

June 17, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शाळेचा पहिलाच दिवस ठरला शेवटचा… भावाला आणताना ट्रकची दुचाकीला धडक, बहिण-भावाचा मृत्यू; कुटुंब लोटले दुःखाच्या खाईत

June 17, 2025
मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

June 16, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

आनंदाची बातमी! गृह आणि कार लोन झालं स्वस्त; व्याजदरात मोठी कपात; कर्ज घेतलेल्यांना होणार मोठा फायदा

June 16, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा