सुरज फुगारे । राज्यात सर्वत्र दुधाचे दर ढासळले आहेत . यामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.यामुळे ताबडतोब दूध दरवाढ करावी, मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना तूर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात मिळावी,या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार स्वप्नील रावडे यांना निवेदन दिले आहे.
कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना तुरीच्या पीक विम्यापासून तालुक्याला वगळले आहे. यामुळे खरीप पेरणीसाठी १९ हजार ४७३ शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. खरिपाच्या पीक विम्यात बाजरी, सूर्यफुलाचा विमा दिला ; मात्र तूर वगळल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
तर मृग बहार २०१९ मध्ये डाळिंब पिकाची भरपाई देताना विमा कंपनीने प्रत्येक महसूल मंडलला वेगवेगळी भरपाई दिली. तीन मंडलातील वगळलेले शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष राहुल घुले,तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार , आबा खांडेकर,महादेव येडगे,आप्पा बंडगर , बाबुराव पाटील , बाळासाहेब कपले , हनुमंत बिराजदार उपस्थित होते.
Swabhimani’s statement on crop insurance in mangalwedha

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज