टीम मंगळवेढा टाईम्स । मोहोळ पोलिसांना अज्ञात पुरूष जातीचे प्रेत मिळून आले असून या प्रेताबाबत ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोहोळ-सोलापूर या हायवे रोडवर सावळेश्वर शिवारात मेन रोडच्या कडेला गणेश रामा पवार यांचे शेताजवळ अंदाजे वय ६७ वर्ष असणारे पुरूष जातीचे प्रेत मीळून आले आहे.
अंगात निळा रंगाचा गोल गळ्याचा टी शर्ट , अर्धनग्न अवस्थेत दाढी पांढरी केस पांढरे , डोळे घारे व काळे असलेले प्रेत सात जुन रोजी मिळून आले आहे.
याबाबत कोणी ओळखत असल्यास नातेवाई असल्यास मोहोळ पोलिस ठाण्यात पो.ना. हळे यांचे संपर्क करावा असे अवाहन मोहोळ पोलिसाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज