mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चाराडेपो व पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करा; शेतकऱ्यांना वेठीला धरू नका; आ.आवताडे यांनी दिल्या संबंधित विभागाला सक्त सूचना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 16, 2023
in मंगळवेढा
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

टीम मंगळवेढा टाईम्स। 

खरीप हंगामातील पावसाची ओढ लक्षात घेता तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांचे पशुधन जतन करण्यासाठी चाराडेपो व जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी पाणी टँकर सुरु करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

गावभेट दौऱ्यावर असताना आ.आवताडे यांच्याकडे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी चाराडेपो आणि पाणी टँकर सुरु करण्याची मागणी केली असता तालुक्यातील पशुसंवर्धन, महसूल व कृषी विभागांनी या मागणीच्या अनुषंगाने सर्वेक्षण येत्या ४ ते ८ दिवसांमध्ये करुन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आ.समाधान आवताडे यांनी दिले आहेत.

सदर मागणी संदर्भात आपली भूमिका मांडताना पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपले पशुधन जगविण्यासाठी बाहेरील तालुक्यातून ४००० ते ५००० हजार रुपयांनी प्रतीटन दराने ऊस आणावा लागत आहे.

या सर्व बाबींच्या विचार करुन आ आवताडे यांनी सोलापूर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये ही मागणी केली होती.

सदर मागणीच्या सकारात्मक पूर्ततेसाठी व शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी हे प्रस्ताव लवकरात-लवकर सादर करावेत असेही आ आवताडे यांनी सांगितले आहे.

आमदार आपल्या दारी या अभियानाअंतर्गत आ आवताडे यांनी तालुक्यातील तब्बल ४२ प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवार पासून गावभेट दौरा सुरु केला आहे. आ आवताडे यांनी शनिवारी तालुक्यातील अकोले, शेलेवाडी, गणेशवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचाळे, शिरसी, गोणेवाडी, खुपसंगी, जालिहाळ, हाजापूर या गावांचा गावभेट दौरा करुन जनतेच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

वरील अनेक गावांमध्ये महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना विजेचा लपंडाव व पुरेश्या डी.पी.अभावी होणारा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देताच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार

डी. पी. बसविण्यासाठी कोणतीही हयगय करू नका अथवा शेतकऱ्यांना वेठीला धरू नका असा सक्त सूचना आ.आवताडे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. तसेच रीतसर वीज कनेक्शन कोटेशन भरून सुद्धा अनेकांना गेल्या अनेकांना अंधारात दिवस काढावे लागत असल्यामुळे आ आवताडे यांनी महावितरण विभागावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

येत्या ८ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भात असणाऱ्या सर्व समस्यांचा निपटारा करा असा आदेशही त्यांनी दिला.

त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सुलभ वाट नसल्यामुळे त्यांना आपली शेती नाईलाजास्तव पडीक ठेवावी लागत आहे. या अनुषंगाने आ आवताडे यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली व भूमी-अभिलेख, स्थानिक तलाठी व गावातील इतर जेष्ठ मंडळी यांची उपसमिती स्थापन करुन सदर प्रश्न लवकरात-लवकर निकाली काढण्याचेही आ आवताडे यांनी आदेशीत केले आहे.

शेतात जाण्यासाठी बांधावरून तसेच हद्दीवरुन अनेक तंटे निर्माण झाल्यामुळे पाणंद रस्त्याचा मोठा निधी खर्ची पडणे मागे राहिले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान पेन्शन योजनेसाठी जे शेतकरी लाभार्थी आहेत.

परंतु गेल्या अनेक हप्त्यापासून ते या योजनेपासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही व मार्गदर्शन करण्याचेही या दौऱ्यादरम्यान सूचित करण्यात आले.

गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेल्या व तालुक्यातील ४० गावांसाठी पाणी प्रश्नावर जीवनदायीनी असणाऱ्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आ आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून सुरु होऊन अनेक गावांमध्ये या योजनेचे पाणी पोहचले असून उर्वरित गावांसाठी सुद्धा या योजनेचे पाणी पोहचवण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून.

तसेच या योजनेतील पाणी लाभार्थी गावांना दररोज मिळण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याचेही आ आवताडे यांनी आदेशीत केले आहे. शेलेवाडी, लेंडवे चिंचाळे या गावांमधून अनेक विद्यार्थी व इतर नागरिक शिक्षण आणि निरनिराळ्या कामानिमित्त

मंगळवेढा व सांगोला या तालुक्याच्या ठिकाणी जाणे-येणे करत असतात त्यामुळे या गावांवरून एस. टी. बस सुरु करण्याची मागणी झाल्यानंतर आ आवताडे यांनी एस. टी. महामंडळ विभागाला याबाबतीत सकारात्मक विचार करुन एस. टी. सुरु करणेबाबत सूचित केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 24, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
Next Post
प्रांताधिकारी यांची कसून चौकशी सुरू, लाचखोर नळे प्रकरण गाजनार; अँटी करप्शन अधिकाऱ्यांच्या हाती महत्त्वाचे पुरावे? मोठा मासा गळाला लागणार

नागरिकांनो! अनोळखी व्यक्ती, भाडेकरूची माहिती पोलिस ठाण्याला द्या; सोलापूर जिल्ह्यात कलम १४४ चे आदेश

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा