मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेणार्या एका विद्यार्थीनीचा वर्गातच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना बीड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी घडली आहे.
सदर विद्यार्थीनीने काही दिवसांपूर्वीच शाळा, ट्युशन यामुळे ताण येत असल्याचे पालकांना सांगितले होते.
त्यावर पालकांनी शाळाही बदलण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वीच ही घटना घडली. शेख रमशा असे या मुलीचे नाव असून ही शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शुक्रवारी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली.
वर्गात पहिल्याच क्रमांकाच्या डेस्कवर बसली होती. यादरम्यान तिने डेक्सवरच मान टाकली. तिला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.
या संदर्भात मुलीच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला. गुरुवारी रात्री रमशा शेख ही रात्री १ वाजेपर्यंत होमवर्क करत होती. शाळ आणि ट्युशन यामुळे आपल्याला ताण येत असल्याचे तिने पालकांना सांगितले होते.
यामुळे त्यांनी शाळा बदलण्याचाही निर्णय घेतला होता. परंतु तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज