मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम केलेल्या ठेकेदारांची कामे करूनही चार वर्षा पासून बिले मिळत नसल्याने या व्यवसायावर अवलंबून असणारे मजूर व छोटे उद्योग यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी बाबुराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवेढा, सांगोला येथील ठेकेदारांच्या बैठकीत बिले तत्काळ मिळावीत. अन्यथा ९ ऑगस्ट पासून वरील दोन्ही तालुक्यातील ठेकेदार काम बंद आंदोलन करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ठेकेदार योगेश खटकाळे यांनी दिली.
सांगोला येथे सांगोला, मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम करणाऱ्या ठेकेदारांची बैठक ३० जुलै रोजी बाबुराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
ठेकेदारांनी ५०, ५४, ०४, ०३ या हेडची तसेच एस आर. व एफ डी आरची रस्त्याची, पुलाची व बांधकामाची कामे केली असून सदरची कामे पूर्ण झाली आहेत.
परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून या केलेल्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत. यामुळे सर्व ठेकेदार कर्जबाजारी झाले आहेत. या उद्योगावर आधारित जिल्लामा साना निगा प्रधान मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे.
यामुळे ह्या कामाची बिले तात्काळ मिळणे आवश्यक आहे. या कामाची बिले मिळावीत म्हणून १ ऑगस्ट रोजी अधीक्षक अभियंता सोलापूर यांना सर्व ठेकेदारांच्या वतीने बिले मिळावीत म्हणून निवेदन देण्यात येणार आहे.
या कामाची बिले न मिळाल्यास ९ ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सांगोला मंगळवेढा पंढरपूर येथील सर्व ठेकेदाराने दिला असल्याची माहिती ठेकेदार योगेश खटकाळे यांनी दिली.
या बैठकीस बाळासाहेब एरंडे, चेतन गाढवे, क्रांतीलाल डुबल, अतुल पवार, एम. आर. गायकवाड, बाळासाहेब आसबे, मधुकर साळुंखे, बुवा बंडगर, तानाजी बागल, सचिन बागल, निलेश माने, डी.एस. राऊत, धनंजय पाटील, आकाश येडगे आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज