mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनो! दहावी-बारावीच्या परीक्षा ‘या’ पद्धतीने होणार, एप्रिलनंतर होईल परीक्षा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 29, 2020
in शैक्षणिक
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

टीम मंगळवेढा टाईम्स ।

दहावी आणि बारावीच्या विषयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्‍यप्राय मानले जात आहे. दुसरीकडे बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिकांद्वारे परीक्षा घेणेही विद्यार्थीहिताचे नाही.

तर मे महिन्यातील उन्हाळा आणि जूनमधील पावसाळ्याचा अनुभव पाहता ही परीक्षा ऑफलाईनच घेतली जाणार असून 23 एप्रिलनंतर परीक्षा घेण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरु आहे.

दरवर्षी दहावी- बारावीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी- मार्चपासून सुरु होते. मात्र, यंदा कोरोनामुळे 15 जूनऐवजी 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. तत्पूर्वी, ऑनलाइन शिक्षण देण्यात आले.

ADVERTISEMENT

मात्र, त्यातून विद्यार्थ्यांना एकतर्फीच शिक्षण मिळाले. आता 23 एप्रिलपर्यंत हे वर्ग सुरु राहणार असून त्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु झाले आहे. दरम्यान, जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत, त्यांच्यासाठी गुगल मिटद्वारे ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

दि.23 एप्रिलपर्यंत किमान 70 टक्‍क्‍यांपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्यादृष्टीने शिक्षकांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंतच्या 25 हजार 866 पैकी साडेनऊ हजार शाळा सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे 59 लाख 27 हजार 456 पैकी सुमारे चार लाखांपर्यंत विद्यार्थी शाळेत येत आहेत.

त्यात दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे आता एक ते दीड महिना उशिराने दहावी- बारावीची परीक्षा घेण्याचे नियोजन युध्दपातळीवर सुरु झाले असून जानेवारीत बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर होईल, असेही सांगण्यात आले.(सकाळ)

ऑनलाइन परीक्षा अशक्‍य

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असते. दुसरीकडे त्यांच्या विषयांची संख्याही खूप असल्याने ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्‍य आहे. परीक्षेचे वेळापत्रक ठरविण्यासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे.– अर्चना काळे, अध्यक्ष, पुणे बोर्ड

दहावी वर्गासाठी असतात एकूण 64 हून अधिक विषय,बारावीतील विविध फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांचे असतात 128 विषय,

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने ऑफलाईनच होणार परीक्षा,सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करुन परीक्षा केंद्रांवरच होणार परीक्षा; केंद्रे वाढीची शक्‍यता

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Join WhatsApp Group for Latest News

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दहावी-बारावीपरीक्षा

संबंधित बातम्या

शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील ५वी ८वीचे वर्ग ‘या’ तारखेपासून सुरू होणार

January 16, 2021
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! बोर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी दिली मुदतवाढ

January 12, 2021
शिक्षकांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या लढ्याला पहिले यश, शिक्षक भरतीवरील स्थगिती शासनाने उठवली

महाविद्यालये केव्हा सुरू होणार ? मंत्री उदय सामंत यांची दिली महत्त्वाची माहिती

January 10, 2021
मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर, MPSC च्या परीक्षाबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

मराठा उमेदवारांना MPSC परीक्षांसाठी  EWS चा पर्याय निवडण्याची सूचना

January 6, 2021
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दहावी, बारावीच्या परीक्षा ‘या’ महिन्यात होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

January 4, 2021
म्युच्युअल फंड हा गुंतवणूक करण्याचा एक चांगला आणि प्रसिद्ध पर्याय, जाणून घ्या सविस्तर

म्युच्युअल फंड हा गुंतवणूक करण्याचा एक चांगला आणि प्रसिद्ध पर्याय, जाणून घ्या सविस्तर

January 4, 2021
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दहावी,बारावीच्या परीक्षेसाठी १७ नंबर फॉर्म भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत

January 2, 2021
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

MPSC आयोगाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय , परीक्षा देण्याची कमाल मर्यादा निश्चित

December 31, 2020
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

December 23, 2020
Next Post
वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित

सोलापूर ब्रेकिंग! आजपासून जिल्ह्यातील मद्य विक्री तीन दिवसांसाठी राहणार बंद

ताज्या बातम्या

प्रशांत गायकवाड यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

प्रशांत गायकवाड यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

January 18, 2021
सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कोंडभैरी

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कोंडभैरी

January 18, 2021
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

मंगळवेढा राष्ट्रवादीत गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बाजूला केले जाणार; कोण म्हणाले,वाचा सविस्तर

January 17, 2021
नवा नियम! तुम्ही जर PhonePe, Google Pay, Paytm वापरत असाल तर ‘ही’ बातमी वाचा

सावधान! तुम्हालाही मिळाला आहे का असा मेसेज? गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट

January 17, 2021
काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी

मंगळवेढा ब्रेकिंग! ‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच, ‘एवढ्या’ किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जाणार

January 17, 2021
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

मंगळवेढा नगरपालिकेची हद्दवाढ होणार, बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी : नगराध्यक्षा अरुणा माळी

January 17, 2021
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

Join WhatsApp Group for Latest News