mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आजपासून ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन; गावोगावी आता पोलिसांचे खबरी, फिरणाऱ्यांची देणार गुपचूप टीप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 21, 2021
in सोलापूर
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आजपासून ग्रामीण भागात (शहर हद्द वगळून) कडक लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे.

गावा-गावात मोकाट, विनाकारण फिरणाऱ्यांवर ग्रामीण पोलीस हे ग्रामस्तरीय कृती समितीच्या माध्यमातून वॉच ठेवणार आहेत. कृती समितीला गावात मोकाट फिरणाऱ्यांची नावे लिहून ठेवण्यास सांगितले आहे.

ती नावे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांकडे दिल्यानंतर संबंधित पोलीस ठाणे संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात (शहर हद वगळून) कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस दि.२१ मेच्या सकाळी ७ वाजल्यापासून ते १ जून २०२१ ला सकाळी ७ वाजेपर्यंत कडक सी.आर.पी.सी. १४४ कलम लागू केले आहे.

आदेशातील प्रतिबंधात्मक नागरिकांना उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर आपत्ती व्यवस्थापन बंदोबस्त , नाकाबंदी लावण्यात आलेली आहे.

याशिवाय होम क्वारंटाईन कोरोनाबाधित रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी, कोविड लॉकडाऊन टेस्टिंग रुग्णालय, लॅब, हॉट स्पॉट गावे, उपाययोजनांची हाय अलर्ट गावे आदी ठिकाणी जास्तीचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.  गावस्तरावर नियुक्त ग्रामस्तरीय समितीत सरपंच, ग्रामसेवक ,तलाठी, पोलीस पाटील , तंटामुक्त अध्यक्षांचा समावेश आहे.

काय बंद राहणार …

किराणा दुकाने , किरकोळ व ठोक विक्रेत्यांची दुकाने , व्यापारी दुकाने , उपाहारगृहे , लॉज , हॉटेल्स , रिसॉर्ट , मॉल , बाजार , मार्केट , वाईन शॉप , बिअर शॉपी , दारू दुकाने , बेकरी , बाजार समिती , भाजी मार्केट , मटण , चिकन , अंडी , मासे विक्रीची दुकाने , खाद्यपदार्थ विक्रेते , धार्मिक प्रार्थनास्थळे , सिनेमागृहे , सभागृहे , नाट्यगृहे , व्हिडिओ गेम पार्लर , केशकर्तनालये , शाळा महाविद्यालये , क्रीडास्थळे.

हे सुरू राहणार …

रुग्णालये , निदान केंद्र , दवाखाने , लसीकरण केंद्र , वैद्यकीय विमा कार्यालये , औषध दुकाने , औषध कंपन्या , आरोग्य सेवा व व सेवा पुरविणारी उपकरणे , घरपोच दूध विक्री करण्यास सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत परवानगी , हॉटेल्स , रेस्टॉरंट , उपाहारगृहांसाठी फक्त घरपोच सेवा सुरू राहणार आहे.

पोलीस स्टेशन देणार पासेस

कडक लॉकडाऊन कालावधीत मेडिकल दुकानदार, घरपोच सेवा देणारी हॉटेल्स , रेस्टॉरंट, उपाहारगृहे, डिलिव्हरी बॉय आदी अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या नागरिकांना संबंधित नजीकच्या पोलीस ठाण्यातून पास मिळणार आहे. पास नसणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक सातपुते यांनी सांगितले.

वाहन जप्त करून गुन्हे दाखल होणार

विनाकारण व मोकाट फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिसांना दिले आहेत. घराबाहेर पडणाऱ्यांवर वाहनधारकांची वाहले जप्त करून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिवाय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशान्वये ५०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

कृषीविषयक दुकानांना दुपारपर्यंत सवलत

शेतकऱ्यांचा खरीप हंगाम महत्वाचा असल्याने पोलीस आयुक्तालय हद्द वगळून ग्रामीण भागातील कृषीविषयक दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत कोरोनाचे नियम पाळून सुरू राहतील.

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम आणि राज्य शासनाच्या कृषी आयुकांच्या पत्रानुसार कृषी दुकानांच्या वेळेत शिथिलता ग्रामपंचायत , जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीत कृषीविषयक बियाणे , खते , किटकनाशके , शेतीशी निगडीत असलेली कृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते दुपारी २ या काळात चालू राहतील.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लॉकडाउनसोलापूर ग्रामीण पोलीस

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
Next Post
संतापजनक! दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून

नात्याला काळिमा! अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीने गळा आवळून केला खून

ताज्या बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा