टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील ग्रामीण भागात आज पुन्हा 519 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज एकूण 2 हजार 692 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 2 हजार 173 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 519 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर आज 374 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने एकूण बाधितांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आज 519 रुग्ण नव्याने आढळल्याने आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या 17 हजार 658 एवढी झाली आहे. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाणही दररोज दहाच्या पुढे असल्याने तो आकडा हे पाचशे पार होऊन 504 एवढा झाला आहे.
कोरोनामुळे अद्यापही 6 हजार 41 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर आतापर्यंत 11 हजार 313 जणांना रुग्णालयातून कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडले आहे.
आज ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू
माळशिरस तालुक्यातील ठोंबरे दहिगाव येथील 70 वर्षाची महिला, माढ्यातील 67 वर्षाचे पुरुष, अकलूज (ता. माळशिरस) येथील 28 वर्षाची महिला, मार्केट यार्ड जवळ सांगोला येथील 70 वर्षाची महिला, वाखरी (ता. पंढरपूर) येथील 70 वर्षाचे पुरुष,
कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील 65 वर्षाचे पुरुष, उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील 61 वर्षाचे पुरुष, संजय नगर अक्कलकोट येथील 54 वर्षाचे पुरुष, अलीपूर रोड बार्शी येथील 66 वर्षाची महिला तर गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षाच्या महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला.
सोलापूर शहरात आज 28 पॉझिटिव्ह 3 जणांचा बळी
सोलापूर शहराची लोकसंख्या 12 लाखांहून अधिक आहे. तरीही आतापर्यंत 72 हजार 322 संशयितांची कोरोना टेस्ट झाली. त्यातून 64 हजार 794 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दुसरीकडे सात हजार 528 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज 233 संशयितांची टेस्ट करण्यात आली होती.
त्यापैकी 28 पॉझिटिव्ह सापडले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कलावती नगरातील (एमआयडीसी रोड परिसर) 45 वर्षीय आणि नितीन नगरातील (अक्कलकोट रोड) 46 वर्षीय महिला, तर पारशी विहिरीजवळ (कुमठा नाका) 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
Solapur rural city corona report Today again 519 positive, 10 victims
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज