मंगळवेढा टाईम्स टीम ।
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने विळखा घातला असून या विळख्यात 11 तालुखे आडकले आहेत.आज आलेल्या अहवालामध्ये पुन्हा 345 नवे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एकाच दिवशी दहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ( Solapur rural corona update )
मागील तीन दिवसांपासून दररोज 300 हून अधिक रुग्णांची भर पडत आहे. तर दुसरीकडे गेल्या 9 दिवसात तब्बल 69 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. या 9 दिवसामध्ये 2 हजार 200 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत ही संख्या सर्वाधिक मानली जात आहे. कोरोनाबाधितांची संख्या आता 5 हजार 902 एवढी झाली आहे.
जिल्ह्यातील ‘या’ भागातील 10 जणांचा मृत्यू
पंढरपूर येथील पोलिस लाइनमधील 52 वर्षीय पुरुष, नवीन कराड नाका पंढरपूर येथील 56 वर्षीय पुरुष, पानगाव (ता.बार्शी) येथील 38 वर्षीय महिला, वैराग (ता. बार्शी) येथील 82 वर्षीय पुरुष, कसबा पेठ माढा येथील 48 वर्षीय पुरुष, खैराव येथील 75 वर्षाचे पुरुष, जवळा (ता. सांगोला) येथील 45 वर्षीय पुरुष तर अकलूज येथील 65 वर्षीय महिला,तडवळ (ता. अक्कलकोट) येथील 58 वर्षीय महिला, कुरनूर येथील 66 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात 172 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
‘या’ भागात आढळले नवे कोरोनाबाधित रुग्ण
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, खोमनाळ, सांगोल्यातील बामणी, घेरडी, जवळा, कडलास, कोष्टी गल्ली, महूद, वासूद,बार्शीतील आडवा रस्ता, आगळगाव रोड, अलिपूर रोड, आझाद चौक, भवानी पेठ, भोगेश्वरी मंदिराजवळ, बुरुड गल्ली, डाणे गल्ली, दत्तनगर, गाताचीवाडी, घारी, जामगाव रोड, कासारवाडी रोड, कव्हे, खुरपे बोळ, लोखंड गल्ली, लोकमान्य चाळ, मंगळवार पेठ, नाईकवाडी प्लॉट, परंडा रोड, पाटील चाळ, सारोळा, स्वराज कॉलनी आणि उपळाई रोड येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे.
पंढरपुरातील आढीव, चंद्रभागा घाट, गाताडे प्लॉट, घनशाम सोसायटी, गोविंदपुरा, गोपाळपूर, हरिदास वेस, इसबावी, जुनी पेठ, कैकाडी मठ, करकंब, कर्मयोगीनगर, कासेगाव, काशीकापड गल्ली, कोळी गल्ली, कुंभार गल्ली, लक्ष्मी टाकळी, महात्मा फुले चौक, मेंढे गल्ली, नागपूरकर मठ, नवीपेठ, नवीन कराड नाका, बडवे चौक, काळा मारुती मंदिर परिसर, ओझेवाडी, पंचमुखी मंदिर परिसर, परदेशी नगर, पोलिस लाइन, रुक्मिणीनगर, सह्याद्रीनगर, संतपेठ, समतानगर, सरकोली, सावरकरनगर, शेगाव दुमाला, शिवक्रांतीनगर, शुक्रवारपेठ, तन्हाळी, तिरंगानगर, उन्नती रेसिडेन्सी, उत्पाद गल्ली, विजापूर गल्ली, विणे गल्ली, विठ्ठलनगर, वाघोली बिल्डींग येथे कोरोना रुग्ण आढळून आले.
अक्कलकोटमधील समर्थनगर, ग्रामीण रुग्णालय, स्वामी समर्थनगर, बोरोटी, कर्जाळ, जेऊर, नन्हेगाव, तोळणूर, करमाळ्यातील घोलपनगर, जामखेड रोड कोर्टी, मंगळवारपेठ फंड गल्ली, पिंपळवाडी, शेलगाव (वां), आवाटी, आणि
माळशिरस तालुक्यातील अकलूज रोड, अकलूज, बागेचीवाडी, चाकोरे, धर्मपुरी, कण्हेर, महाळूंग, माळीनगर, पळसमंडल, पिलीव, पिंपरी, संगम, श्रीपूर, वेळापूर, यशवंतनगर, मोहोळमधील नागनाथ गल्ली, वडवळ, पाटकूल, कुरुल, कामती बु, देगाव (वा), अनगर, माढ्यातील हनुमानमंदिराजवळ, कुटे प्लॉट, कुर्डुवाडी, लऊळ, मोडनिंब, निमगाव टे, दक्षिण सोलापुरातील बरूर, हत्तूर, मंद्रूप, मुस्ती, उत्तर सोलापुरातील कोंडी, कळमण, मार्डी येथेही नव्या रुग्णांची भर पडली.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज