mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 12, 2026
in मंगळवेढा
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

आठ वर्षांनंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पंचायत समितीच्या ६ जागा जिंकत ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर आज सभापतिपदाची निवड होणार आहे.

सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेल्या या खुर्चीवर चोखामेळानगर गणातील विजयी उमेदवार दीपाली आनंद ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी भाजपमध्ये राजकीय हालचाली वेगाने सुरू आहेत. चोखामेळानगर गणातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या दीपाली ताड यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

त्यामुळे भाजपच्या ‘लाडक्या बहिणी’ पैकी सभापतीपदाची माळ अखेर ताड यांच्या गळ्यात पडणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सभापतीपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने जयश्री कवचाळे (बोराळे), मोहिनी गणपाटील (मरवडे) आणि दीपाली ताड (चोखामेळानगर) या तीन प्रमुख दावेदारांची नावे पुढे आली आहेत.

मात्र, चोखामेळानगर गणातून सर्वाधिक मतांनी निवडून येत जनतेचा ठाम कौल मिळविल्यामुळे दीपाली ताड यांचे पारडे सध्या जड मानले जात आहे. मंगळवेढा तालुक्यातील राजकारणात आ. समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांची स्वतंत्र ताकद असली तरी भाजप सत्तेत येण्यासाठी या दोघांचे एकत्रित समीकरण महत्त्वाचे ठरले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही परिचारक समर्थकांनी आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिल्याने या समीकरणाचा प्रभाव निर्णय प्रक्रियेतही दिसून येत आहे.

दरम्यान, परिचारक गटाच्या मोहिनी गणपाटील यादेखील सभापतीपदाच्या स्पर्धेत असल्याची चर्चा आहे. मात्र, सत्ता संतुलन आणि गटांतील समन्वय राखण्यासाठी त्यांना दुसऱ्या टप्प्यात संधी देण्याचा पर्यायही पक्षपातळीवर विचाराधीन असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे पहिल्या टप्प्यात दीपाली ताड यांना संधी देऊन पुढील काळात मोहिनी गणपाटील यांना सभापतीपदाची जबाबदारी देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या जयश्री कवचाळे यांच्यामुळे रमेश भांजे यांचा विजय सुकर झाल्याने त्यांच्याही नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र जनाधार, मताधिक्य आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा, या बाबींमुळे सध्या दीपाली ताड यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे.

उपसभापती पदासाठी ही नावे चर्चेत

उपसभापती पदासाठी अर्जुन मल्लाळे किंवा डॉ.अप्पा निकम यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. आज अंतिम निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवेढा पंचायत समितीच्या सत्ता समीकरणाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दुपारी दोनपर्यंत निवड होणार

नूतन पदाधिकारी यांच्या स्वागतासाठी पंचायत समिती प्रशासनाची लगबग सुरू असून, सर्व तयारी केली आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत सभापती अन् उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर निवडणूक अधिकारी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता सर्व सदस्यांच्या बैठकीत या निवडी केल्या जाणार आहेत.

सर्वसाधारण महिलेला संधी मिळण्याची शक्यता

उपसभापती पदासाठी विनायक यादव इच्छुक असून त्यांना संधी मिळणार हे निश्चीत आहे. तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटात आमदार आवताडे यांनी सर्व साधारण जागेवरती ओबीसी उमेदवारांना संधी देऊन निवडून आणले आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत जातीय समीकरण बघून सर्वसाधारण जागेवर देखील ओबीसी उमेदवारांना संधी दिली आहे. जनहित विकास आघाडी (आवताडे गट) ची सत्ता असताना २०१६ ला सभापती पद हे सर्वसाधारण होते. त्यावेळी ओबीसी मतदार संघामधून निवडून आलेले प्रदीप खांडेकर, प्रेरणा मासाळ यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे सर्वसाधारण महिलेला संधी मिळण्याची शक्यता आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पंचायत समिती सभापती दीपाली ताड

संबंधित बातम्या

हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातून पत्रकार नवत्रे व ग्रामसेवक पाटील निर्दोष मुक्त; पुराव्याअभावी न्यायालयातून नाव वगळले;​ राजकीय सूडबुद्धीचा डाव उधळला

August 17, 2026

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

मंगळवेढ्यातील ‘त्या’ एका घटनेने खळबळ! प्रांत कार्यालयाशेजारी मध्यरात्री नक्की काय घडलं? वाचा पडद्यामागचे सत्य…

August 17, 2026
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मंगळवेढ्यात आज घुमणार देशभक्तीचा सूर! ‘सुरसंगम’ व ‘माजी सैनिक संघटने’तर्फे ‘मेरे देशप्रेमियों…’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

August 15, 2026
Next Post
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातून पत्रकार नवत्रे व ग्रामसेवक पाटील निर्दोष मुक्त; पुराव्याअभावी न्यायालयातून नाव वगळले;​ राजकीय सूडबुद्धीचा डाव उधळला

August 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..