टीम मंगळवेढा टाईम्स । लॉकडाऊन कालावधी वाढविल्यानंतर मध्य रेल्वेने पुढील पार्सल रेल्वे गाड्यांची वाहतूक ३० जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.काही बदल खाली दिलेल्या माहितीनुसार केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शालीमार पार्सल गाडी ३० जनूपर्यंत दररोज सुटेल . शालीमार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पार्सल ट्रेन दिनांक २ जुलैपर्यंत दररोज सुटेल . या पार्सल गाड्या विद्यमान वेळ , पथ , थांबे आणि रचना याप्रमाणेच सोडल्या जातील . छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चैन्नई सेंट्रल पार्सल रेल्वे गाडी खालील वेळेनुसार वाडी – सिकंदराबाद विजयवाडा मार्गे चालविण्यात येतील.
टर्मिनस -चेन्नई सेंट्रल पार्सल रेल्वे गाडी ३० जूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज १९ .३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या सेंट्रल येथे पोहोचेल. चेन्नई सेंट्रल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पार्सल रेल्वे गाडी दिनांक २ जुलै पर्यंत दररोज १२.३० वाजता चैन्नई सेंट्रल येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
००११५ व ००११६ या पार्सल गाड्या दोन्ही दिशेने लोणावळा , पुणे , सोलापूर , वाडी , सिकंदराबाद , विजयवाडा येथे थांबतील . पार्सल लोडर्स आणि ई – कॉमर्स कंपन्या ज्यांना आवश्यक वस्तू पाठवायच्या आहेत त्यांना ही संधी घेता येईल , असे आवाहन मध्ये रेल्वे विभागाने केली आहे.
Solapur parcel trains will run till June 30
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज