mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा ब्रेकिंग : ‘त्या’ कोरोनाबाधित व्यक्तीसंदर्भात प्रशासनाने केला मोठा खुलासा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढा ब्रेकिंग : ‘त्या’ कोरोनाबाधित व्यक्तीसंदर्भात प्रशासनाने केला मोठा खुलासा

समाधान फुगारे । मंगळवेढा तालुक्यात आढळलेला रुग्ण गेल्या दीड महिन्यापासून तो गावी वास्तव करण्यास आलेला नाही.तसेच त्याचा काही कालावधी पूर्वी झालेला तात्पुरता प्रवास सुद्धा अल्प कालावधीसाठी असल्याने व त्यासही पुरेशा सुरक्षित कालावधी उलटलेला असल्याचे चौकशीअंती निदर्शनास आलेले असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. Prantadhikari Uday Singh Bhosale Information mangalwedha corona patient traveling history

आज मंगळवेढा तालुक्यातील एका व्यक्तीचा करोना बाबतचा तपासणी अहवाल प्राप्त झाला , याबाबत माहीती अशी कि सदरची २३ वर्षीय व्यक्ती पंढरपूर मधील भक्तनिवास येथेच तात्कालिक वास्तव्यास असून नोकरी करीत आहे.

त्याचे मूळ गाव जरी मंगळवेढा तालुक्यातील गाव असले तरी तो लॉक डाऊन काळात कधीतरीच गावी येत होता.गेल्या दीड महिन्यापासून तो गावी वास्तव करण्यास आलेला नाही. तसेच त्याचा काही कालावधी पूर्वी झालेला तात्पुरता प्रवास सुद्धा अल्प कालावधीसाठी असल्याने व व त्यास त्यासही पुरेशा सुरक्षित कालावधी उलटलेला असल्याचे चौकशीअंती निदर्शनास आलेले आहे.

त्यामुळे या व्यक्तीचा केवळ कायमचा पत्ता मंगळवेढा असला तरी गेल्या दिड महिन्यापासून तो गावी आलाच नसल्याने व तो जिथे काम करतो तेथील कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात तो आला होता म्हणून त्या व्यक्तीचे पंढरपूर मध्येच त्याचे विलिनीकरण केले होते व तेथेच त्याचे नमुने घेण्यात आले होते आणि नमुना तपासणी साठी पाठविला असता , तो पॉझिटिव्ह आला आहे.

या व्यक्तीचा कारोना विषयक विषयक बाबींचा संपर्क हा पंढरपूर तालुक्याशी निगडित असल्याने व त्याचे निकटचे संपर्क ही तेथेच निश्चित झाल्याने मंगळवेढा तालुक्यातून या व्यक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नसल्याचे स्वीकृत दर्शनी दिसून येत आहे.

त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात कंटेनमेंट झोन जाहीर करण्याची आवश्यकता नाही. प्रशासनाकडुन सदर प्रकरणी सतर्कता बाळगली असून आवश्यकते नुसार कार्यवाहीसाठी सज्ज असल्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.

पाटखळ-खुपसंगी शिवारात रहावयास असलेला 24 वर्षीय सुरक्षा रक्षक हा पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे  चार वर्षापासून  कार्यरत असून त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. सुरक्षा रक्षक हा मंगळवेढयाचा असला तरी तो 22 दिवसापुर्वी मंगळवेढयास येवून गेल्याने मंगळवेढेकरांनी न घाबरता व अफवांवर विश्‍वास न ठेवता नागरिकांनी नियमित मास्क वापरणे,सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन  डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांनी केले आहे.

पाटखळ- खुपसंगी शिवारातील 24 वर्षीय युवक पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे.त्याचा संपर्क सुरक्षा अधिकारी यांच्याशी आल्याने त्याला वाखरी येथे इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन करण्यात आले होते.त्याचा अहवाल पॉझिटीव्ह  शनिवार दि. 4 जुलै रोजी सायंकाळी 4.00 वा. आल्याने मंगळवेढा तालुक्याच्या कानाकोपर्‍यात ही बातमी वार्‍यासारखी पसरली.

सोलापूर जिल्हयातील 11 तालुक्यापैकी एकमेव मंगळवेढा हा कोरोनापासून चार हात दुर असलेला तालुका म्हणून जिल्हयात ओळख आहे.तो सुरक्षा रक्षक दि.12 जून रोजी मंगळवेढयात खुपसंगी शिवारात येवून गेला होता. तदनंतर तो मंगळवेढयाकडे आला नाही. दि.29 जून रोजी विठ्ठल मंदिरातील  सुरक्षा अधिकारी पॉझिटिव्ह आल्याने तो सुरक्षा रक्षक त्यांच्या संपर्कात आला होता. सुरक्षा रक्षक पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समजताच मंगळवेढयाचे डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांनी सदर सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेतली.

यावेळी तो मागील 22 दिवसापुर्वी येवून गेल्याचे कुटुंबियांनी सांगितले.परिणामी मंगळवेढयाला कोरोनापासून चार हात दूर ठेवायचे असेल तर नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने व पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.नागरिकांनी कामाव्यतिरिक्त विनाकारण घराच्या बाहेर पडू नये,बाहेर जाताना मास्कचा प्रत्येकाने वापर करावा.बाजारात गेल्यानंतर सोशल डिस्टन्स पाळावे आदी नियमांचे प्रत्येक नागरिकाने पालन केल्यास मंगळवेढा निश्‍चितच कोरोनापासून दूर राहिल.

—————————



ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मोहोळमध्ये आज एका दिवसाचा जनता कर्फ्यू

मोहोळमध्ये आज एका दिवसाचा जनता कर्फ्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 28, 2026
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 28, 2026
लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

April 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

शाळेच्या उंबरठ्यावरच दारूचे पेले? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा संताप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

April 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा