
समाधान फुगारे । मंगळवेढा तालुक्यात आढळलेला रुग्ण गेल्या दीड महिन्यापासून तो गावी वास्तव करण्यास आलेला नाही.तसेच त्याचा काही कालावधी पूर्वी झालेला तात्पुरता प्रवास सुद्धा अल्प कालावधीसाठी असल्याने व त्यासही पुरेशा सुरक्षित कालावधी उलटलेला असल्याचे चौकशीअंती निदर्शनास आलेले असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. Prantadhikari Uday Singh Bhosale Information mangalwedha corona patient traveling history
आज मंगळवेढा तालुक्यातील एका व्यक्तीचा करोना बाबतचा तपासणी अहवाल प्राप्त झाला , याबाबत माहीती अशी कि सदरची २३ वर्षीय व्यक्ती पंढरपूर मधील भक्तनिवास येथेच तात्कालिक वास्तव्यास असून नोकरी करीत आहे.
त्याचे मूळ गाव जरी मंगळवेढा तालुक्यातील गाव असले तरी तो लॉक डाऊन काळात कधीतरीच गावी येत होता.गेल्या दीड महिन्यापासून तो गावी वास्तव करण्यास आलेला नाही. तसेच त्याचा काही कालावधी पूर्वी झालेला तात्पुरता प्रवास सुद्धा अल्प कालावधीसाठी असल्याने व व त्यास त्यासही पुरेशा सुरक्षित कालावधी उलटलेला असल्याचे चौकशीअंती निदर्शनास आलेले आहे.
त्यामुळे या व्यक्तीचा केवळ कायमचा पत्ता मंगळवेढा असला तरी गेल्या दिड महिन्यापासून तो गावी आलाच नसल्याने व तो जिथे काम करतो तेथील कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात तो आला होता म्हणून त्या व्यक्तीचे पंढरपूर मध्येच त्याचे विलिनीकरण केले होते व तेथेच त्याचे नमुने घेण्यात आले होते आणि नमुना तपासणी साठी पाठविला असता , तो पॉझिटिव्ह आला आहे.
या व्यक्तीचा कारोना विषयक विषयक बाबींचा संपर्क हा पंढरपूर तालुक्याशी निगडित असल्याने व त्याचे निकटचे संपर्क ही तेथेच निश्चित झाल्याने मंगळवेढा तालुक्यातून या व्यक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नसल्याचे स्वीकृत दर्शनी दिसून येत आहे.
त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात कंटेनमेंट झोन जाहीर करण्याची आवश्यकता नाही. प्रशासनाकडुन सदर प्रकरणी सतर्कता बाळगली असून आवश्यकते नुसार कार्यवाहीसाठी सज्ज असल्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.
पाटखळ-खुपसंगी शिवारात रहावयास असलेला 24 वर्षीय सुरक्षा रक्षक हा पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे चार वर्षापासून कार्यरत असून त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. सुरक्षा रक्षक हा मंगळवेढयाचा असला तरी तो 22 दिवसापुर्वी मंगळवेढयास येवून गेल्याने मंगळवेढेकरांनी न घाबरता व अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी नियमित मास्क वापरणे,सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांनी केले आहे.
पाटखळ- खुपसंगी शिवारातील 24 वर्षीय युवक पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे.त्याचा संपर्क सुरक्षा अधिकारी यांच्याशी आल्याने त्याला वाखरी येथे इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन करण्यात आले होते.त्याचा अहवाल पॉझिटीव्ह शनिवार दि. 4 जुलै रोजी सायंकाळी 4.00 वा. आल्याने मंगळवेढा तालुक्याच्या कानाकोपर्यात ही बातमी वार्यासारखी पसरली.
सोलापूर जिल्हयातील 11 तालुक्यापैकी एकमेव मंगळवेढा हा कोरोनापासून चार हात दुर असलेला तालुका म्हणून जिल्हयात ओळख आहे.तो सुरक्षा रक्षक दि.12 जून रोजी मंगळवेढयात खुपसंगी शिवारात येवून गेला होता. तदनंतर तो मंगळवेढयाकडे आला नाही. दि.29 जून रोजी विठ्ठल मंदिरातील सुरक्षा अधिकारी पॉझिटिव्ह आल्याने तो सुरक्षा रक्षक त्यांच्या संपर्कात आला होता. सुरक्षा रक्षक पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समजताच मंगळवेढयाचे डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांनी सदर सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेतली.
यावेळी तो मागील 22 दिवसापुर्वी येवून गेल्याचे कुटुंबियांनी सांगितले.परिणामी मंगळवेढयाला कोरोनापासून चार हात दूर ठेवायचे असेल तर नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने व पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.नागरिकांनी कामाव्यतिरिक्त विनाकारण घराच्या बाहेर पडू नये,बाहेर जाताना मास्कचा प्रत्येकाने वापर करावा.बाजारात गेल्यानंतर सोशल डिस्टन्स पाळावे आदी नियमांचे प्रत्येक नागरिकाने पालन केल्यास मंगळवेढा निश्चितच कोरोनापासून दूर राहिल.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












