mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात अंथरुणाला खिळून असलेल्यांनाही मिळणार घरपोच लस; जाणून घ्या…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 27, 2021
in सोलापूर, राज्य
कोरोना लसीचा डोस घेतल्यावर ‘हे’ पिता येणार नाही?.वाचा सविस्तर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. अशा रुग्णांची सेवा करणाऱ्यांनी ऑनलाइन माहिती भरल्यानंतर डॉक्टर घरी जाऊन लसीकरण करतील,असे हे नियोजन आहे.

 

दरम्यान, १ ते १७ वयोगटातील मुले वगळता इतर सर्वांना लसीकरण सुरू झाले आहे. आरोग्य, फ्रंटलाइन कर्मचारी, १८ ते ४४, ४५ वर्षांवरील कोमार्बिड व ६० वर्षांपुढील ज्येष्ठ व्यक्ती, अशा गटांसाठी टप्प्याने लसीकरण सुरू झाले.

सोलापूर जिल्ह्यात या वयोगटातील ३५ लाख ७८ हजार लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांमध्ये आणखी वेगवेगळ्या स्थितीचे लाभार्थी आहेत. सध्या १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थी मोठ्या प्रमाणावर लसीकरणापासून वंचित आहेत.

 

याचबरोबर सर्व वयोगटात दिव्यांग व अंथरुणाला खिळून असलेले, बेघर, अति जोखमीच्या आजार असलेल्या व्यक्ती आहेत. अशांसाठी वेगळी मोहीम घेण्यात येत आहे.

अद्याप घरी जाऊन लस देण्यास शासनाने परवानगी दिली नाही; पण हायरिस्कमधील लोकांना लस देण्यासाठी वेगळी मोहीम घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे मोबाइल व्हॅनमधूॅन लसीकरण करण्याचा प्रयोग हाती घेण्यात आला आहे.

 

वृद्धत्व, अपंगत्व, पॅरॅलिसिस, अपघात व इतर आजारांमुळे अनेक जण अंथरुणाला खिळून आहेत. अशा रुग्णांना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाणे शक्य होत नाही. अशा व्यक्तींसाठी काळजी घेणाऱ्या व्यक्तींकडून लसीकरण करण्यासाठी मदत घेता येणार आहे.

लवकरच अशा व्यक्तींना ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे. ही माहिती ऑनलाइन भरल्यानंतर आरोग्य विभागाचे कर्मचारी घरी जाऊन अशा रुग्णांना सेवा देणार आहेत.

मुंबई महापालिकेने असा प्रयोग सुरू केला आहे. शासनाने परवानगी दिल्यावर टास्क फोर्स समितीच्या मंजुरीने सोलापुरातही हा प्रयोग करण्याचा प्रस्ताव असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.

दिव्यांगांसाठी खास मोहीम

जिल्ह्यात २९ हजार ९२ व्यक्ती दिव्यांग आहेत. या सर्वांना लस मिळावी म्हणून समाजकल्याण विभागातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

आरोग्य केंद्रावर आल्यावर प्राधान्यक्रमाने दिव्यांगांना लस देण्यात येत आहे. सायकल, स्कूटर, रिक्षा, कारमधून आलेल्या दिव्यांगांना आहे त्याच ठिकाणी डोस देण्यात आला आहे. सुमारे साडेतीन हजार जणांनी याचा लाभ घेतला आहे.

हायरिस्क व्यक्तींसाठी सत्र

सोलापूर, बार्शी व पंढरपूर या तीन तालुक्यांत सेक्सवर्करसाठी मोहीम हाती घेण्यात आली. मोबाइल व्हॅन व विशेष सत्रातून १,१०० जणींना लसीकरण करण्यात आले, अशी माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.

ADVERTISEMENT

त्याचबरोबर एचआयव्हीबाधितांची संख्या १२ हजारांवर आहे. यातील ९०० जणांनी शासकीय रुग्णालयाच्या सेंटरवर लस घेतली आहे. याचबरोबर हायरिस्कमधील ६०० जणांना लस देण्यात आली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना लससोलापूर
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनीचे पाणी बारामतीला वळवणे कायमचे होणार बंद; पाच भ्रष्ट नेत्यांच्या फायली तयार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

August 19, 2022
खळबळ! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावचा सरपंच अपात्र; विभागीय आयुक्तांची कारवाई

मंजुरी! आता संरपंचांची निवड थेट जनतेतूनच होणार; सभागृहात विधेयक मंजूर

August 18, 2022
नेत्याचं प्रेम असावं तर अस्सं!उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने भरवला पेढा, कार्यकर्ते फिदा; व्हिडिओ व्हायरल

नेत्याचं प्रेम असावं तर अस्सं!उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने भरवला पेढा, कार्यकर्ते फिदा; व्हिडिओ व्हायरल

August 17, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

गरजूंना मिळणार मदत! बंद असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा सुरू; सोलापूरच्या ‘या’ सुपुत्राची विशेष कार्याधिकारी म्हणून नियुक्ती

August 17, 2022
न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा, ठाकरे सरकारसाठी महत्त्वाचा दिवस; काय घडणार?

कामाची बातमी! राज्यातील ‘या’ नागरिकांसाठी आता एस.टीचा प्रवास मोफत; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

August 17, 2022
Breaking! पाठीमागून येणाऱ्या कारने पिकअप गाडीला उडवले, मंगळवेढ्यातील एकाचा मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

आईला का मारहाण केली याचा जाब विचारत वडिलांना झाडाला बांधून केली मारहाण, वडिलांचा जागीच मृत्यू; मामा-भाच्यास अटक

August 16, 2022
सनराईज पब्लिक स्कूल शेळवे येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा; उद्योजक राजेंद्र फुगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण

सनराईज पब्लिक स्कूल शेळवे येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा; उद्योजक राजेंद्र फुगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 16, 2022
Breaking! विनायक मेटे यांचे निधन; मराठा आरक्षण आंदोलनाचा बुलंद आवाज हरपला

सस्पेन्स! विनायक मेटेंचा ड्रायव्हर अन् आयशरच्या ड्रायव्हरची समोरासमोर बसून चौकशी; काय येणार समोर?

August 16, 2022
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

भुलभुलैय्या! विदेशातून गिफ्टचे आमिष, शिक्षकाची साडेबारा लाखांची फसवणूक; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 18, 2022
Next Post
शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार! आजपासून तापमान वाढीचे अन् वादळी पावसाचे संकेत

गावकऱ्यांनो सावधान! भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ताज्या बातम्या

उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनीचे पाणी बारामतीला वळवणे कायमचे होणार बंद; पाच भ्रष्ट नेत्यांच्या फायली तयार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

August 19, 2022
विकासात्मक आमदार! मंगळवेढा व पंढरपूर नगरपरिषदेस ५ कोटी मंजूर, समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश; संपूर्ण कामांची यादी पाहा…

मंगळवेढा तालुक्यातील रस्ते आता चकाचक होणार; अधिवेशनाच्या पाहिल्यास दिवशी 50 कोटींचा निधी मंजूर

August 19, 2022
जिल्हाधिकारी साहेब! वाळू माफियांची दहशत वाढली; वाळू ठेकदाराकडून शेतकऱ्यांना मारहाण

मंगळवेढ्यात शेळया शेतात सोडल्याच्या कारणावरून एकास लोखंडी गजाने मारहाण तीघाविरूध्द गुन्हे दाखल

August 18, 2022
खळबळ! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावचा सरपंच अपात्र; विभागीय आयुक्तांची कारवाई

मंजुरी! आता संरपंचांची निवड थेट जनतेतूनच होणार; सभागृहात विधेयक मंजूर

August 18, 2022
नेत्याचं प्रेम असावं तर अस्सं!उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने भरवला पेढा, कार्यकर्ते फिदा; व्हिडिओ व्हायरल

नेत्याचं प्रेम असावं तर अस्सं!उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने भरवला पेढा, कार्यकर्ते फिदा; व्हिडिओ व्हायरल

August 17, 2022
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

गरजूंना मिळणार मदत! बंद असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा सुरू; सोलापूरच्या ‘या’ सुपुत्राची विशेष कार्याधिकारी म्हणून नियुक्ती

August 17, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा