मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर शहरात शुक्रवारी ३२८ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी २७९ अहवाल निगेटिव्ह तर ४९ अहवाल पॉझिटिव्ह तर चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.
एकूण रुग्ण ३०७५, डिस्चार्ज दिलेले रुग्ण १६९८, मृत रुग्ण २९६ तर १०८१ रुग्णांवर उपचार सुरु
तसेच आज ९१ जण कोरोनामुक्त झाले असून अद्याप तब्बल २७७ अहवाल प्रलंबित आहेत. आज मृत्यू पावलेले बल्लारी चाळ, लक्ष्मी पेठ, धाकटा राजवाडा, पूर्व मंगळवार पेठ, स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती, समाधान नगर या परिसरातील असल्याचेही माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज