टीम मंगळवेढा टाईम्स।
भैरवानाथ शुगर वर्क्स लि.,युनिट नं.3, लवंगी, या कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२२ करिता
गळीत झालेल्या ऊसास प्रति मे.टन १०० रु.प्रमाणे उस बिल शेतकर्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांनी दिली आहे.
पुढे बोलताना प्रा.शिवाजीराव सावंत म्हणाले की, भैरवनाथ शुगरने गळीत हंगाम २०२१-२२ ची एफआरपी १९३०.८० रु. प्रति मे. टन असताना देखील यापूर्वीच २१०० रु. प्रति मे. टन ऊस दर दिलेला आहे.
सुरुवातीपासुन ऊस उत्पादकांशी असलेली बांधीलकी कायम ठेवत शेतकर्यांचे हित लक्षात घेता व ऊस उत्पादकांना मागणी केल्याप्रमाणे
भैरवनाथ शुगरने १०० रु प्रति मे. टन देण्याचे जाहीर केले आहे व सदरची रक्कम लवकरात लवकर शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करीत आहोत.
यावेळी व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी सांगितले की, कारखान्याचे संस्थापक आरोग्य मंत्री ना.प्रा.डॉ.तानाजीराव व चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत सर यांचे अचुक मार्गदर्शनाखाली कारखान्याचे गाळप सुरळीत चालू आहे.
यावेळी कारखान्याचे जनरल मँनेजर रविंद्र सांळुखे व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज