मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत, राज्यात पशुधन विमा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. अनेक वर्षानंतर सरकारने पशुपालकांसाठी ही महत्त्वाकांक्षी पशुधन विमा योजना आणली आहे. जनावरांच्या किमतीच्या १५ टक्के रक्कम विम्यापोटी भरायची आहे.

शेतकरी पशुपालकांसाठी ही महत्त्वाची योजना असली, तरी १५ विमा कंपन्यांकडे भरावी लागणारी १५ टक्के रक्कम ही कमी नाही. जनावरांच्या किंमतीच्या १५ टक्के रक्कम भरावयाची आहे.

देशी संकरीत गाय, बैल, म्हैस, रेडा, शेळी, मेंढी या पशुंचा विमा भरता येणार आहे. एक वर्ष, दोन वर्षे व तीन वर्षांसाठी हा पशुंचा विमा भरता येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात ७ लाख ५० हजार गाय, म्हैस ५ लाख, सव्वा लाख मेंढी, शेळी १० लाख, ११ हजार वराह, एक हजार घोडे, गाढव दोन हजार, उंट ३२ तर २० लाख कोंबडी असे ४२ लाख ८७ हजार पशुधन आहे. २१वी पशुगणना झाली असली, तरी त्याची आकडेवारी आलेली नाही.

जनावरांसाठी विमा
७० हजार दुधाळ गाय, ८० हजार दुधाळ म्हैस/रेडा : ७० हजार बैल, शेळी/मेंढी : ७ हजार

योजना महत्वाची
आजार, अपघात व नैसर्गीक अपघाताचे प्रमाण वाढल्याने पशुधनाला धोका होऊन शेतकऱ्यांची हानी टाळण्यासाठी पशुधन विमा योजना महत्वाची असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त अनिल तांबे यांनी सांगितले.

प्रति कुटुंब कमाल १० पशुधनपर्यंत विमा संरक्षण
पशुधनाची नोंद १२ अंकी राष्ट्रीय डिजिटल व्यवस्थांतर्गत आवश्यक, सर्व पशुधनाचे सर्वेक्षण शासनाच्या 3 नियमानुसार करणे आवश्यक, वाहतूक विमा संरक्षण समाविष्ट नाही.

अपघात, नैसर्गिक आपत्ती, आजार व मृत्युसमयी विमा संरक्षण, शेळी, मेंढीचे विमा संरक्षण राज्याच्या भौगोलिक मर्यादेत लागू, आर्थिक नुकसानीपासून संरक्षण, कर्जबाजारीपणा कमी.
पशुपालकांची आर्थिक स्थिती टिकविण्यास मदत, पशुधन संवर्धन व उत्पादन वाढीस चालना, लाभार्थ्याने आधार कार्ड, ९ पशुधनाचा सर्व बाजूने फोटो, लसीकरण प्रमाणपत्र, नोंदणीकृत पशुवैद्यकाचे प्रमाणपत्र.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














