बाळासाहेब झिंजुरटे । पतीच्या नोकरीसाठी माहेरहून १६ लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा पती , सासू , दिर व जाऊ यांनी शारीरिक , मानसिक त्रास देत छळ केला. पैसे आणले नाही तर जीवे मारण्याची व दुसरे लग्न लावण्याची धमकी दिली.याबाबत गौरी मदने रा.वाढेगांव यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ( Sangola. Harassment of a married woman to bring Rs 16 lakh from Maher )
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी गौरी भानुदास मदने रा.वाढेगांव ता.सांगोला यांना पती भानुदास भागवत मदने हा २०१२ पासून नोकरीसाठी माहेरहून १६ लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक , मानसिक त्रास देत होता.तर सासू विठाबाई भागवत मदने , दिर शंकर भागवत मदने व जाऊ सुरेखा शंकर मदने यांनी भानुदास यास पत्नी गौरी हिच्याविरोधात भडकावून शिवीगाळ , दमदाटी केली.
तसेच पतीला मारहाण व मानसिक त्रास देण्यास सांगितले. तसेच वरील सर्वांनी फिर्यादी गौरी मदने यांना पैसे आणले नाही तर जीवे मारण्याची व दुसरे लग्न करण्याची धमकी दिली.याबाबत गौरी मदने यांनी पती भानुदास मदने , सासू विठाबाई मदने, दिर शंकर मदने व जाऊ सुरेखा मदने यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोना मोहोळकर करत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज