टीम मंगळवेढा टाईम्स ।
सकल मराठा समाज मंगळवेढा शहर व तालुका पायी दिंडी व आक्रोश मोर्चा पंढरपूर ते मुंबई मंत्रालय एल्गार मराठयांचा गजर विठूनामाचा दि . ७/११/२०२० रोजी दुपारी १२.०० वा . ही दिंडी विठ्ठलाचे दर्शन घेवून अनेक घोषणांचा नाद घुमवत मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करत निघणार आहे.
या दिंडीत जे कोणी सहभाग घेणार आहेत त्यांनी तेथील समन्वयकाशी संपर्क साधावा असे आवाहन मराठा समाजाचे युवक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कोंडुभैरी यांनी केले आहे.
या दिंडीचे मार्गक्रमण पंढरपूर , तोंडले बोंडले , अकलूज , निमगाव केतकी , बारामती , हडपसर , आकुर्डी , तळेगाव दाभाडे , कामशेत , लोणावळा , खोपोली चौक , पनवेल , नेरूळ , चेंबूर , मंत्रालय असा आहे.
आपल्या पुढील पिढीच्या भविष्यासाठी आपण दिंडीमध्ये जे मावळे सहभागी होतील त्यांना पाठींबा देण्यासाठी दि. ७/११/२०२० रोजी दुपारी १२.०० वा. आपल्या समाजबांधवांना पाठींबा दिला पाहिजे.
आरक्षणाचे ज्यांना फायदे झाले आहेत ते लोकच आरक्षणाचे महत्व सांगू शकतात.
हा मोर्चा आरक्षणावरील आलेली स्थगिती उठवण्याकरीता दिंडी रूपाने विठ्ठल रुक्मिणीच्या साक्षीने होत असून यात सर्व समाजबांधानी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज