mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 13, 2021
in सोलापूर
रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

टीम मंगळवेढा टाईम्स ।

करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोला 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय झाला आहे.

राज्य शिखर बॅंकेचे कर्ज असल्याने बॅंकेकडून हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू होती. मुंबईत राज्य बॅंकेच्या कार्यालयात झालेल्या लिलाव प्रक्रियेत हा कारखाना बारामती ऍग्रोकडे देण्यात आला.

नक्की वाचा : – Job update! मंगळवेढ्यातील सनशाईन बालरुग्णालयात विविध पदांसाठी मोठी भरती

दरम्यान, आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आमदार पवार उत्सुक असल्याचे वारंवार बोलले जात होते. मात्र, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हेदेखील हा कारखाना घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिंदे समर्थकांकडून सांगण्यात येत होते.

पण, आमदार शिंदे यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती.गेली 15 वर्षांपासून आदिनाथ कारखान्यावर रश्‍मी बागल यांच्या नेतृत्वाखाली बागल गटाची एकहाती सत्ता होती.

मात्र, संचालकांमधील मतभेद, योग्य नियोजनाचा अभाव, संचालकाअंतर्गत एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप अशा कारणांमुळे हा कारखाना अडचणीत येत गेला. मुंबईत आज झालेल्या लिलाव प्रक्रियेत बारामती ऍग्रोने हा कारखाना चालविण्यास घेतला.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या आस्मितेचा विषय होता. मात्र हा कारखाना मागील दहा वर्षांपासून रडतखडत चालत असल्याने कारखान्यावर कोट्यवधींचे कर्ज झाले होते,

त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना कारखाना जवळ असूनही बाहेरील कारखान्यांना ऊस द्यावा लागत होता. हा कारखाना सहकारीच राहावा, असे अनेकांना वाटत असताना “बारामती ऍग्रो’ने हा कारखाना चालवण्यास घ्यावा, असाही सूर शेतकऱ्यांमधून येत होता.

कारखान्याच्या चहूबाजूंनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड असताना देखील कारखाना चांगल्या पद्धतीने चालू शकला नाही. आदिनाथ कारखान्याच्या कामगारांच्या पगाराचा प्रश्न तर महाराष्ट्रभर गाजला होता.

अशा परिस्थितीत आदिनाथ कारखान्यावरील कर्जाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना कारखाना बंद अवस्थेत गेला. त्यामुळे आदिनाथ कारखान्याची विक्री केली जाणार की भाडेतत्त्वावर चालवला जाणार, याविषयी गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू होती.

आदिनाथ कारखाना “बारामती ऍग्रो’ने चालवायला घेतल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्याची ऊस घालवण्यासाठी होणारी फरफट थांबून इतर कारखान्यांपेक्षा चांगला भाव मिळेल, अशी आशा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आजच्या निर्णयाने वाटू लागली आहे.

करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवताना “बारामती ऍग्रो’कडून कोणत्याही प्रकारचे राजकारण केले जाणार नाही.

कारखाना आदर्श पद्धतीने चालविण्याचा आमचा मानस आहे. ज्या पद्धतीने “बारामती ऍग्रो’ कारखाना उत्कृष्ट पद्धतीने चालवला जातो. त्याच पद्धतीने आदिनाथ कारखाना नियोजनाबद्ध पद्धतीने चालवला जाईल.– सुभाष गुळवे, उपाध्यक्ष, बारामती ऍग्रो

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: रोहित पवार

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​दारू प्याल तर १० हजारांचा भुर्दंड; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने ऐतिहासिक ठराव; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाचा धाडसी निर्णय; गावात दारूबंदीसाठी कडक नियमावली लागू

August 11, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश शेती दौऱ्यावर जाण्याची संधी; कृषी विभागाकडून अर्ज करण्याचे इच्छूक शेतकऱ्यांना आवाहन

August 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मंगळवेढ्यात तुमची जमीन, प्लॉट किंवा घर विकायचंय? मिळवा सर्वोत्तम किंमत आणि १००% सुरक्षित व्यवहार; पारदर्शकता आणि विश्वासाचे एकमेव नाव ७/१२ डेव्हलपर्स; 9970766262 व 9890605962 आजच संपर्क साधा

August 9, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठे काय आहेत हे दाखवून देऊ! मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला थेट इशारा; राजकीय वर्तुळात खळबळ

August 9, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

​ग्रामीण तरुणाईला गावातच रोजगाराची सुवर्णसंधी; ‘कृषि उद्योजक निवड अभियानाला प्रारंभ; ‘माणगंगा परिवार’ आणि ‘ई-ॲग्री दुकान’चा ग्रामीण युवकांसाठी मोठा पुढाकार

August 8, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 10, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
Next Post
चांगली बातमी! कोरोनाचे पाहिले लसीकरण ‘या’ देशात; 12 डिसेंबरपासून लस टोचली जाण्याची शक्यता

आनंदाची बातमी! कोरोना लस सोलापुरात दाखल, पहिल्या टप्प्यात 'या' लोकांना मिळणार लस

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढ्यात थरार! काळ्या स्कॉर्पिओतून आले अन् चाकू-रॉडने हल्ला केला; कार बंद पडल्याचा फायदा घेत कुटुंबाला धाक दाखवून १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 12, 2026
सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​दारू प्याल तर १० हजारांचा भुर्दंड; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने ऐतिहासिक ठराव; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाचा धाडसी निर्णय; गावात दारूबंदीसाठी कडक नियमावली लागू

August 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा