mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यातील 26 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर; सर्व गटांचे दावे, कोणी-कोणी कोणत्या ग्रामपंचायतीवरती केला दावा? जाणून घ्या..

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 6, 2023
in मंगळवेढा
मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यातील 26 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर; सर्व गटांचे दावे, कोणी-कोणी कोणत्या ग्रामपंचायतीवरती केला दावा? जाणून घ्या..

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील 26 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि प्रत्येक राजकीय पक्ष आपणच सर्वांत मोठा पक्ष ठरल्याचा दावा करू लागला आहे.

दरम्यान, बरेच ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य यांनी आम्ही गाव पातळीवर आघाडी करून निवडणूक लढवली असून यामध्ये कोणी दावा करू नये असे खाजगीत बोलताना सांगितले.

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आ.समाधान आवताडे यांचे मंगळवेढा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व असल्याचा केला दावा

नुकत्याच संपन्न झालेल्या मंगळवेढा तालुक्यातील एकूण २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूकांमध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार समाधान आवताडे यांच्या विचारांनी २७ पैकी तब्बल १३ ग्रामपंचायतींवर आपले एकहाती वर्चस्व राखत विजयाचा झेंडा फडकवला आहे.

या टप्प्यात झालेल्या या निवडणुकीमध्ये आ आवताडे यांच्या नेतृत्वाखाली जुनोनी, देगाव, अकोले, बठाण उचेठाण, महमदाबाद हु, जंगलगी , मुंढेवाडी, लमाणतांडा, लक्ष्मीदहिवडी, नंदूर, हिवरगांव, निंबोणी या स्थानिक स्वराज्य संस्थांवर आ आवताडे यांच्या राजकीय विचारांच्या शिलेदारांनी एकहाती विजयाची कमान उभी केली आहे.

तर उर्वरित खडकी, शेलेवाडी, भाळवणी, खुपसंगी, रड्डे, जालिहाळ, ब्रह्मपुरी या ७ ग्रामपंचायतवर आ आवताडे यांच्या गटातील उमेदवारांनी स्थानिक पातळीवर आघाड्या करुन सदस्य पदावर आपली विजयी बाजी मारली आहे.

सर्व विजयी नूतन पदाधिकाऱ्यांचा आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे कृषी बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये फेटा बांधून सत्कार करत अभिनंदन करण्यात आले. यावेळी सरपंच विनायक यादव, विजय माने,  माजी संचालक पप्पू काकेकर, भारत निकम, सरपंच शिवाजी सरगर यांच्यासह तालुक्यातील इतर मान्यवरांनी सर्वच विजयी उमेदवारांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची आमदारकी आपल्या खांद्यावर घेतल्यापासून आमदार अवताडे यांनी कोणताही राजकीय आकस मनामध्ये न ठेवता मतदारसंघातील सर्वच नागरिकांच्या मूलभूत व पायाभूत विकासासाठी सलोख्याचे समाजकारण व राजकारण करून मतदार संघाच्या विकासाला गती दिली आहे. आमदार आवताडे यांच्या या विकासाभिमुख दूरदृष्टीचा या ग्रामपंचायत निकालांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.

२१ ग्रामपंचायतीवरती मा.आ.प्रशांत परिचारक प्रणित समविचारी गटाची सत्ता आल्याचा दावा

मंगळवेढा तालुक्यातील आज झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मानेवाडी,रेवेवाडी,लोणार,पडोळकरवाडी,जालिहाळ-सिध्दनकेरी,लक्ष्मीदहीवडी,आंधळगांव,जंगलगी,चिक्कलगी,खडकी,भाळवणी,निंबोणी,शेलेवाडी,अकोला,देगांव,रड्डे,डिकसळ,शिरसी,खुपसंगी,जुनोनी व बिनविरोध ब्रम्हपुरी या २१ ग्रामपंचायतीवरती मा.आ.प्रशांत परिचारक प्रणित समविचारी गटाचा सत्ता आली असल्याचा दावा संत दामाजी सह.साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यानी सांगितले

बबनराव आवताडे गटाने दावा केलेली गावे:-

लक्ष्मी दहिवडी, देगाव ,शिरशी, निंबोणी, मल्लेवाडी ,भाळवणी ,अकोले मुंडेवाडी ,रेवेवाडी, जंगलगी, पडोळकरवाडी, महमदाबाद, हुनूर, खुपसंगी, खडकी ग्रामपंचायतीवर बबनराव आवताडे गटाच्या ताब्यात आल्या असल्याचे दावे करण्यात आले आहेत.

चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचा मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत वर झेंडा फडकला; शरद पवार गटाचे अभिजीत पाटील यांचा ग्रामपंचायतवर झेंडा फडकला असल्याचा दावा केला

मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीमध्ये पंचवार्षिक निवडणूक लागली असता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते अभिजीत आबा पाटील यांनी काही ठिकाणी स्वतंत्र पॅनल तर काही ठिकाणी समविचारीच्या माध्यमातून आपला पॅनल उभा करण्यात आलेला होता. यातूनच अभिजीत पाटलांना घवघवीत यश प्राप्त झालेले दिसून येत आहे.

यामध्ये काही ठिकाणी सरपंच तर काही ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य पदाची बाजी अभिजीत पाटील यांच्या गटाने मारलेली दिसून येत आहे…

एकीकडे राज्यामध्ये अजित पवार व शरद पवार यांच्यामध्ये फूट पडून देखील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे खंबीरपणे शरद पवार यांच्या पाठीमागे उभे राहून शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले असता अभिजीत पाटील हे मंगळवेढा तालुक्यात जोमाने व गावोगावी फिरवून आपला गट व पक्ष बांधणीमध्ये व्यस्त दिसत आहेत.  यामध्येच पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची चाचणी झाल्याचे बोलले जात आहे..

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांनी निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीने ग्रामपंचायतीमध्ये सर्वांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहिलेले असून दिसून आले..

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी,  खडकी, देगाव, शिरशी, शेलेवाडी, डिसकळ, निबोंणी, मानेवाडी, रेड्डे, आंधळगाव, खूपसंगी, या ग्रामपंचायतीमध्ये आपले पॅनल निवडून आल्याबद्दल उमेदवारांचे अभिनंदनपर सत्कार श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आले.

8 ग्रामपंचायतीवर भालके गट व समविचारी आघाडीचे सरपंच विजयी असल्याचा दावा

मंगळवेढा तालुक्यातील आज झालेल्या ग्रामपंचायत निवडून निकालात भालके गटाचा झंजावत भाळवणी, जंगलगी, चिक्कलगी, शिरसी, खुपसंगी, देगांव, डिकसळ या 7 ग्रामपंचायती वर भालके गटाचे सरपंच विजयी तर लोणार, मानेवाडी आंधळगाव, शेलेवाडी, लक्ष्मी दहिवडी, रड्डे, रेवेवाडी, अकोला या 8 ग्रामपंचायती वर भालके गट व समविचारी आघाडीचे सरपंच विजयी.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा ग्रामपंचायत निवडणूक 2022

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढ्यात थरार! काळ्या स्कॉर्पिओतून आले अन् चाकू-रॉडने हल्ला केला; कार बंद पडल्याचा फायदा घेत कुटुंबाला धाक दाखवून १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 12, 2026
सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

August 11, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढा पोलिसांना संभाजी ब्रिगेडचे थेट आव्हान; अवैध धंदे रोखा, नाहीतर १५ ऑगस्टला आमरण उपोषण

August 11, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मंगळवेढ्यात तुमची जमीन, प्लॉट किंवा घर विकायचंय? मिळवा सर्वोत्तम किंमत आणि १००% सुरक्षित व्यवहार; पारदर्शकता आणि विश्वासाचे एकमेव नाव ७/१२ डेव्हलपर्स; 9970766262 व 9890605962 आजच संपर्क साधा

August 9, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 8, 2026
Next Post
समृध्दी महिला पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक शेतकरी, उद्योजक, महिलांसाठी मोठी मदत केली जाईल; सीमाताई परिचारक

समृध्दी महिला पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक शेतकरी, उद्योजक, महिलांसाठी मोठी मदत केली जाईल; सीमाताई परिचारक

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढ्यात थरार! काळ्या स्कॉर्पिओतून आले अन् चाकू-रॉडने हल्ला केला; कार बंद पडल्याचा फायदा घेत कुटुंबाला धाक दाखवून १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 12, 2026
सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​दारू प्याल तर १० हजारांचा भुर्दंड; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने ऐतिहासिक ठराव; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाचा धाडसी निर्णय; गावात दारूबंदीसाठी कडक नियमावली लागू

August 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..