मंगळवेढा टाईम्स टीम । माळशिरस तालुक्यातील नऊ व्यक्तींचे कोरोना अहवाल बाधित नसल्याचे आले असून एका व्यक्तीचा अहवाल अप्राप्त असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . रामचंद्र मोहिते यांनी दिली. The reports of nine people from Akluj are negative
माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्यांच्या संपर्कातील १० व्यक्तींचे स्वब तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील नऊ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व बाधित नसल्याचे आहेत, तर एका व्यक्तीचा अहवाल अप्राप्त असल्याची माहिती डॉ. मोहिते यांनी दिली.
वळसंग येथे आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे मोफत वाटप
Free distribution of 30 tablets of arsenic album at Walsang
वळसंगचे (ता.दक्षिण सोलापूर) सुपुत्र तथा कोल्हापूर मनपा आयुक्त डॉ.मल्लिनाथ यांच्या मार्गदर्शनात कार्यरत असलेल्या स्वामी समर्थ सेवा मंडळ , वळसंगच्या वतीने आसेंनिक अल्बम ३० गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
शासनाने अशा गोळ्यांचे वाटप पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांना केले आहे . या गोळ्याचे सेवन केल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढते . त्याचे अन्य कोणतेही परिणाम होत नाहीत , असे महादेव होटकर यांनी सांगितले.
आशासेविका घरोघरी जाऊन या गोळ्यांचे वाटप करणार आहेत. स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सिद्धारूढ काळे , श्रीशैल दुधगी , अयुब अत्तार व आशासेविका यावेळी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज