मंगळवेढा टाईम्स टीम । सोलापुरातील तपासणीनंतर कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर संबंधित रुग्णाने सात रस्ता परिसरात प्रचंड गोंधळ घातला. तब्बल दोन-अडीच तासांनी लादेन शेख यांनी त्या रुग्णाची समजूत काढीत त्यास रुग्णवाहिकेतून नेले. सोमवारी शासकीय विश्रामधाम येथे हा प्रकार घडला. ( solapur city a corona patient lay in a semi-naked state )
संबंधित व्यक्ती हा महापालिकेचा कर्मचारी आहे. दोन दिवसांपूर्वी त्याचा स्वॅब घेतला होता. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणा पोलिसांसह त्याच्या घरी पोचली. मात्र, तो घरी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अधिक तपास सुरू करण्यात आला.
त्या वेळी हा व्यक्ती सात रस्ता परिसरात शासकीय विश्रामधामच्या प्रवेशद्वारासमोर असल्याची माहिती मिळाली. त्या वेळी सर्व प्रशासकीय यंत्रणा तातडीने सात रस्ता परिसरात गेली. पोलिसाला आलेले पाहून संबंधित रुग्णाने गोंधळ घालण्यास सुरवात केली. अंगावरचे कपडे काढले. पथकामध्ये महिला असतानाचे दिसत असूनही त्याने अंगावरचे सर्व कापडे काढले, त्या वेळी काही पोलिसांनी त्याला आडोसा करीत कपडे घालण्यास बाध्य केले.
कपडे घालण्यानंतर त्या रुग्णाने आणखीन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अंगावर धाऊन जाणे, ओरडणे, शिव्या देणे हे प्रकार सुरू केले. त्यामुळे सात रस्ता परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली. ती हटविण्याचे दुसरे काम पोलिसांना लागले. अखेर रुग्णवाहिकेला बोलवण्यात आले.
कोविड रुग्णावर अंत्यसंस्कार करणारे लादेन शेख चालक होते. त्यांनी त्या रुग्णाची समजूत काढली आणि त्यास रुग्णालयाकडे नेण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्याचवेळी वरुणराजानेही हजेरी लावली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज