mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार? भाजपची सर्वात मोठी ऑफर? भाजपकडून राज ठाकरेंना आणखी दोन पर्याय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 24, 2024
in राज्य, राष्ट्रीय
राज गर्जना! जनतेशी गद्दारी का? ठाकरे सरकार स्थापनेवरुन राज ठाकरेंचा शिवसेनेसह यांच्यावर साधला निशाणा…

टीम मंगळवेढा टाईम्स। 

आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत दिल्लीत बैठक… नंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत मुंबईत ताज लँड्स हॉटेलमध्ये चर्चा…. राज ठाकरेंसोबत भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्रातल्या नेतृत्वासोबत ही चर्चा फक्त मनसेला महायुतीत घेणं एवढ्यापुरतीच मर्यादित नाही.

राज ठाकरेंना सोबत घेण्यामागं, मोठी रणनीती असल्याची चर्चा आहे. सध्याच्या राजकीय स्थितीनुसार भाजपनं राज ठाकरेंसमोर 3 पर्याय ठेवल्याचं कळतंय. त्यातला पहिला पर्याय सर्वात मोठा आहे.

मनसेचं शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरण करुन, शिवसेनेचं नेतृत्वच राज ठाकरेंनी करावं. म्हणजेच शिवसेनेची कमान राज ठाकरेंकडे द्यावी अर्थात शिवसेनेचं अध्यक्ष राज ठाकरेंनी व्हावं.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदेंच्याच हातात दिली. आता हीच शिवसेना, राज ठाकरेंना सोबत घेऊन त्यांच्याच हाती देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

मात्र तूर्तास तात्काळ होकार देण्यास राज ठाकरेंनी नकार दिला असून, सुरुवातीला इतर पर्यायांवर विचार करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शिंदेंच्या बंडानंतरही राज ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. मात्र, त्यावेळी तसं काहीही घडलेलं नाही. आता पुन्हा हालचाली सुरु झाल्याचं दिसतंय.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच, राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. माझा वाद विठ्ठलाशी नाहीच, तर त्यांच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे, असं त्यावेळी राज ठाकरे म्हणाले आणि त्यानंतरच्या भाषणात तर उद्धव ठाकरेंमुळंच शिवसेना सोडल्याचं वारंवार सांगितलं.

सध्या उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना निसटलीय. शिवसेनेचं नेतृत्व मुख्यमंत्री शिंदे करत आहेत. आता राज ठाकरेंसमोर जो प्रस्ताव ठेवलाय, त्याचं उद्देश म्हणजे शिवसेना दुसऱ्या ठाकरेंच्याच हाती जाईल.

आता यावरुन काही प्रश्नही निर्माण होत आहेत

पहिला प्रश्न आहे, जर मनसे शिवसेनेत विलीन झाल्यास, शिंदे गटाचं काय होणार ?
दुसरा प्रश्न आहे, राज ठाकरे एवढा मोठा निर्णय घेणार का? कारण बाळासाहेबांना सोडून मनसेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरेंसाठी त्यांच्या राजकीय आयुष्यातला दुसरा मोठा निर्णय असेल. 18 वर्षांपासून राज ठाकरे ज्या मनसेचं नेतृत्व करत आहेत. ती मनसे पुढं दिसणार नाही.

तिसरा प्रश्न आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हे मान्य होईल का? सध्या शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून शिवसेनेचं नेतृत्व शिंदेंच करत आहेत. जर, मनसे विलीन करुन राज ठाकरेंना शिवसेनेचं अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव असेल तर, शिंदे राज ठाकरेंचं नेतृत्वं मान्य करतील का ?

चौथा प्रश्न आहे, शिंदेंच्या आमदारांना मान्य होईल का? एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार आणि 13 खासदार आहेत. या सर्वांना शिवसेना राज ठाकरेंच्या हाती जाणं मान्य असेल का ?
पाचवा प्रश्न आहे, राज ठाकरेंच्या हाती आणि शिंदेंच्या हाती कोणते अधिकार असतील? जर शिवसेनेची कमान राज ठाकरेंच्या हाती गेलीच तर मग राज ठाकरेंना पक्षात कोणते अधिकार असतील? आणि एकनाथ शिंदेंचा रोल काय असेल? तसंच त्यांना किती अधिकार असतील?
चर्चा आहेत की यात काही तथ्य?

प्रश्न अनेक आहेत. पण सध्या चर्चाच आहे. त्यामुळे खरंच राजकीय धुरळा उठवण्यासाठीच चर्चा आहे की यात काही तथ्य आहे हे काळच ठरवेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं अनेकदा बोललं गेलं.

त्यासाठी आपणच 2014च्या विधानसभेत भाजपनं युती तोडल्यानंतर प्रयत्न केल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं होतं. आणि गेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरेंचा किस्सा सांगून शिवसेनेतून बाहेर काढण्याचे कसे प्रयत्न झाले हे सांगितलं.

भाजपकडून राज ठाकरेंना आणखी दोन पर्याय

भाजपकडून राज ठाकरेंसमोर दुसरा पर्याय आहे. मनसेनं महायुतीत यावं. त्यासाठी लोकसभेला 2-3 जागा मनसेला सोडण्यात येईल आणि तिसरा पर्याय आहे , लोकसभेला जागा न देता विधानसभेला अधिक जागा देऊ, पण आता राज ठाकरेंनी महायुतीचा प्रचार करावा.

भाजपच्याच भाषेत सांगायचं झालं तर राजकारण अर्थमेटिक नाही तर केमिट्री आहे. इथं 1 आणि 1, दोन नाही तर 11 होऊ शकतात. आता राज ठाकरे कोणत्या पर्यायात फिट बसतात याचा उलगडा 2-3 दिवसांत होईल.(स्रोत:tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राज ठाकरे

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 14, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
Next Post
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

महाराष्ट्रात राजकीय गाणित बदलणार! लोकसभेसाठी मराठा समाजाची भूमिका ठरली; जरांगेंनी ठेवले दोन पर्याय

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 15, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा