टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील जुगार अड्ड्यावर पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात जुगार खेळणाऱ्या माजी सरपंचासह आठ जणांवर कारवाई करत रोख रक्कम व दोन दुचाकीसह १ लाख २० हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी पदभार घेतल्यापासून तालुक्यातील अनेक अवैध धंद्यावर घाव घालण्यास सुरुवात केली आहे.
त्यामध्ये दारू, जुगार, वाळू या सर्व अवैध धंद्यावर नियंत्रण मिळविण्यास त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामध्ये अनेक गुन्हे दाखल करून रोख रक्कम हस्तगत केली आहे.
त्यांच्या सातत्यपूर्ण कारवाईबाबत नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे. त्यांच्या योग्य सामुळे तालुक्यात गुन्हेगारीत देखील घट झाली आहे.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या सूचनेनुसार रात्रीच्या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजित आवटे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर पेट्रोलिंग करत असताना
कचरेवाडी येथील एका वस्तीवरील पत्राशेडच्या आडोशाला काही लोक पानावर पैसे लावून तीन पाणी जुगार खेळत असल्याचे दिसून आले.
यांच्यावर झाली कारवाई
हनुमंत रावसाहेब कोळेकर, मायाप्पा अंकुश माने, भिकू सोपान काळुंगे, नवनाथ धर्मा माने, करण कालिदास कळसगोंडे, आप्पा सदाशिव जांभळे, नंदू पांडुरंग कोळेकर, सतीश भारत कळसे अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून ४६ हजार ३२० रूपये रोख रक्कम व दोन दुचाकी असा एक लाख २० हजार ८२० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
कचरेवाडी येथे पोलीलिस निरीक्षक रणजित माने यांनी टाकलेली ही दुसरी धाड आहे. यापूर्वीच्या कारवाईत उच्चशिक्षित शासकीय कर्मचारी जुगार खेळताना आढळले होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज