mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

QR Code फ्राॅड :- ऑनलाइन फसवणुकीचा नवीन प्रकार, समजून घ्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 1, 2020
in क्राईम
QR Code फ्राॅड :- ऑनलाइन फसवणुकीचा नवीन प्रकार, समजून घ्या

समाजमाध्यमांवर एक क्यूआर कोड फ्रॉडची घटना व्हायरल झाली होती. एका उद्योजक महिलेनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तिची फसवणूक होता होता टळली. पण सर्वांच्याच बाबतीत ही फसवणूक टळेल असं नाही.

मुळात क्यूआर कोड फ्रॉड काय आहे हेच माहीत नसल्यामुळे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. माहिती तंत्रज्ञान युगामध्ये जगताना सर्वच गोष्टी ह्या सहजरीत्या सिंगल क्लिकवर उपलब्ध होत असल्यानं डिजिटल पेमेंट व्यवस्था, आर्थिक व्यवहार, वस्तूंची खरेदी-विक्री ऑनलाइन् पद्धतीने सुलभ होत चालली आहे.

त्यामुळे ऑनलाइन पेमेंट व्यवस्थेसंदर्भातील संभाव्य धोेके आपण वेळीच ओळखले तर वाढत चाललेल्या सायबर गुन्हेगारीत आपला बळी जाणार नाही.आताशा डिजिटल पेमेंटव्यवस्था सुलभ व्हावी यासाठी फोन पे, गुगल पे, यूपीआय पेमेंटद्वारे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅनचा वापर वाढलेला आहे.

ओलएक्स/क्विकर किंवा इतर वेबसाइटवर फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाड्या यांची सर्रास विक्री होते. हे सर्व देवाणघेवाण ऑनलाइन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून होत असल्याने सायबर गुन्हेगारांनी QR code /क्यूआर कोड फ्राॅड ही सायबर गुन्हेगारीची नवीन पद्धत शोधून काढली आहे. यामध्ये ग्राहकांना काही प्रमाणात ॲडव्हाॅन्स रक्कम पाठविली जाते व एक क्यूआर कोड पाठविला जातो तो स्कॅन करायला सांगून यूपीआय पीन टाकण्याची मागणी केली जाते.

एकदा का ग्राहकानं यूपीआय पीन टाकला तर तुमची बँक अंकाउण्टविषयीची माहिती त्या मालवेअर कोडद्वारे नियंत्रित केली जाते व तुमच्या खात्यातील संपूर्ण रक्कम काढली जाते किंवा दुसऱ्या खात्यात वळती केली जाते.

QR कोड म्हणजे काय

QR कोड म्हणजे क्विक रिस्पाॅन्स कोड असतो ज्यामध्ये Two Dimensional Barcode / द्विमितीय बारकोड हे रोबोट ऑपरेटरद्वारे ट्रॅक /नियंत्रित केले जातात. QR कोड हे रेग्युलर बारकोडपेक्षा स्पेसमध्ये कमी असल्याकारणाने स्मार्टफोन साॅफ्टवेअरद्वारे सुलभरीत्या स्कॅन होतात.

QR कोडमुळे एखाद्या पेमेंट गेटवेची लांबलचक यूआरएल /URL टाइप करायची गरज भासत नाही व हे कोड सहज स्कॅन होत असल्याने वेळेची बचत होत असल्यामुळे त्याचा वापर वाढत चालला आहे.

QR कोडचे दोन प्रकार आहेत

1. क्लिकजॅकिंग्

यामध्ये सायबर क्रिमिनल्सकडून खरेखुरेपणा सिद्ध करण्यासाठी व विश्वास संपादन करण्यासाठी ग्राहकांच्या खात्यामध्ये काही ठरावीक रक्कम आगाऊ टाकली जाते व त्यासोबत एक लिंक पाठवून लिंकसोबत असणारा QR कोड स्कॅन करण्यासाठी सांगितले जाते. यामध्ये क्लिकजॅकिंग ऑपरेटरकडून ग्राहकांची फसवणूक होत असते.

2. फिशिंग मालवेअर QR कोड

यामध्ये स्कॅमर्सद्वारे एखाद्या वेबसाइटच्या माध्यमातून किंवा मेलद्वारे मालवेअर कोड यूजर्सला पाठविले जाते व यूजर्सने ते कोड स्कॅन केल्याबरोबर त्याच्या खात्यातून रक्कम काढून फसवणूक केली जाते. तसेच बनावट बिटकाॅइन ॲड्रेस व QR कोड जनरेट करून बिटकाॅइन पेमेंट काढले जाते. रिडायरेक्ट पेमेंट किंवा स्मॉल ॲडव्हान्स पेमेंटद्वारेही फसवणूक केली जाते.

काळजी काय घ्यायची?

1. यूपीआय पेमेंट गेटद्वारे तुम्हाला ऑनलाइन पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी यूपीआय पीन कधीच विचारलं जात नाही, त्यामुळे ते पीन द्या असं कुणी म्हणालं तर तत्काळ व्यवहार बंद करायचा. ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यासाठी यूपीआय पीन घालावा लागत नाही.

2.अनोळखी ई-मेलला कधीच रिप्लाय देऊ नका किंवा मेलला संलग्न असलेला QR कोड कधीच स्कॅन करू नका.

3.आपल्या मोबाइलमध्ये, संगणकामध्ये QR कोड स्कॅनर वापरा जेणेकरून ते URLचा खरेखुरेपणा चेक करेल.

4.आपल्या मोबाइलमध्ये स्कॅन ब्लाॅकर किंवा वेब फिल्टर सोबत फ्री अंटीमालवेअर साॅफ्टवेअर अपडेट असू द्यावा.

ADVERTISEMENT

5 फोन पेकडून @phonepay.com द्वारे मेल आला तरच त्यास रिप्लाय द्या. तसेच तुमच्या बँक खात्याविषयी किंवा डेबिट कार्डविषयी माहिती लिक झाली असेल तर support.Phonepay.com किंवा संबंधित सायबर पोलीस स्टेन्शला तक्रार द्या तसेच पोलीस किंवा तुमच्या बँकेने ऑनलाइन बँकिंग, सायबर गुन्ह्याविषयी वेळोवेळी दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्या. ऑनलाइन व्यवहार जपून करा. काळजी घ्या.

-आवेज काझी (लेखक सायबर गुन्हे अभ्यासक आणि पोलीस उपनिरीक्षक आहेत.)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ऑनलाइन फसवणूक
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

तु मला आवडतेस आसे म्हणून दिरानेच केला भावजयचा विनयभंग; मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिरा विरूध्द गुन्हा दाखल

January 26, 2023
जिल्हाधिकारी साहेब! वाळू माफियांची दहशत वाढली; वाळू ठेकदाराकडून शेतकऱ्यांना मारहाण

लाडाचा जावई! माहेरात गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण

January 25, 2023
मंगळवेढ्यात सासूच्या खून प्रकरणात जावई अटकेत; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात भरदिवसा घरफोडी केलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

January 23, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मिटींगमध्ये स्वस्तधान्य दुकानाचे रजिस्टर न आणल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन सरपंचास खुर्चीने मारहाण

January 21, 2023
लॉजवर बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाचा भंडाफोड; मंगळवेढ्यातील प्रकार; पीडित मुलीसह आरोपी ताब्यात

लॉजवर बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाचा भंडाफोड; मंगळवेढ्यातील प्रकार; पीडित मुलीसह आरोपी ताब्यात

January 16, 2023
पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

मोठी कारवाई! मंगळवेढ्यात बेकायदा वाळू वाहतुक करणारे चारचाकी वाहन पकडले; पोलिस कोठडीत रवानगी

January 14, 2023
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादावरुन तरुणाने गळफास घेवून केली आत्महत्या

January 14, 2023
संतापजनक! दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून

Breaking! मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला गुप्तांग कापून तरुणाचा खुन; घटनेमुळे तालुक्यात खळबळ

January 14, 2023
जिल्हाधिकारी साहेब! वाळू माफियांची दहशत वाढली; वाळू ठेकदाराकडून शेतकऱ्यांना मारहाण

मंगळवेढ्यात उचल घेतलेल्या पैशाच्या कारणावरून एकास बेदम मारहाण; सहाजणांविरूध्द गुन्हे दाखल

January 11, 2023
Next Post
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दहावी व बारावीच्या परीक्षा यंदा उशिरा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे सूतोवाच

ताज्या बातम्या

घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

सर्व्हर सतत डाऊन होत असल्यामुळे 3 हजार रेशन कार्ड ऑनलाईन नंबरच्या प्रतिक्षेत; मंगळवेढा पुरवठा विभागातील प्रकार

January 27, 2023
Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

January 27, 2023
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

कौतुकास्पद! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील ‘या’ अधिकाऱ्यास आंतरिक सुरक्षा पदक जाहीर

January 26, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

तु मला आवडतेस आसे म्हणून दिरानेच केला भावजयचा विनयभंग; मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिरा विरूध्द गुन्हा दाखल

January 26, 2023
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

मंगळवेढा तालुक्यात 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून ‘या’ अधिकाऱ्यांच्या झाल्या नियुक्त्या; आदेश जारी

January 26, 2023
मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत निंबोणीत आज मोफत हृदयरोग तपासणी शिबिर

January 27, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा