mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ढकलपास पद्धत आता कायमची बंद; अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी मिळणार ‘इतक्या’ संधी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 2, 2025
in राज्य, शैक्षणिक
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता बदलली आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे बंद झाले आहे.

सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेतली का, उत्तरपत्रिकांची तपासणी व गुणदान बिनचूक आहे की नाही?, याची पडताळणी आता ‘डायट’चे अधिकारी व शिक्षणाधिकारी करणार आहेत.

त्यासाठी सर्व शाळांना पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वर्षभर जनत करून ठेवाव्या लागणार आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून आता पाचवी व आठवीच्या परीक्षांवर लक्ष ठेवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील या इयत्तेतील विद्यार्थ्यांची पारदर्शकपणे परीक्षा घेतली जाते का?, याची पडताळणी प्राथमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) माध्यमातून होणार आहे.

काही दिवसांपूर्वी पाच ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसंदर्भातील अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना अंक ओळख, वजाबाकी, भागाकार देखील येत नसल्याची बाब समोर आली.

अनेकांना वाचायला देखील जमत नसल्याचे या सर्व्हेतून उघड झाले. दुसरीकडे सरकारी शाळांमधील प्रवेश देखील गुणवत्तेच्या कारणामुळे घटल्याची बाब स्पष्ट झाली.

शाळांची गुणवत्ता वाढावी, विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या इयत्तेत पुढे जाताना त्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार व्हावा, यासाठी आता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ढकलपास पद्धत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेण्याचे नियोजन ‘एससीईआरटी’कडून करण्यात आले आहे.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी दोन संधी

इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करून दिल्या जातात. एप्रिलमध्ये या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल. त्यात अनुत्तीर्ण झालेल्यांची पुढे मे-जून महिन्यात फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.

याही परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला विद्यार्थी त्याच वर्गात राहणार असून त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही. त्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात आली की नाही, याची पडताळणी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या आधारे केली जाणार आहे.(स्रोत:सकाळ)

प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे जपून ठेवाव्या लागतील

इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा प्रकार आता बंद झाला आहे. मागच्या वर्षी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोनअंकी आहे.

आता इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यावर त्यांची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका शाळांनी जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. त्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांची फेरतपासणी शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) अधिकारी करतील. तसे आदेश त्यांना दिले आहेत. – राहुल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ढकलपास

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
Next Post
महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

राडा महागात पडला! शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांचे तब्बल 'इतक्या' वर्षांसाठी निलंबन; राज्य कुस्ती संघटनेचा निर्णय

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा