mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोनाचा हाहाकार : पुण्यात रुग्णांची वाढती संख्या ठरतेय डोकेदुखी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कोरोनाचा हाहाकार : पुण्यात रुग्णांची वाढती संख्या ठरतेय डोकेदुखी

टीम मंगळवेढा टाईम्स । पुणे जिल्ह्यात आठवडाभरापासून 200 ते 300च्या घरात कोरोनाग्रस्त अढळून येत असून, एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 480 झाली आहे. मंगळवारी शहरात 255 कोरोनाग्रस्त आढळून आले, तर नऊ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. चिंचवड रेल्वे स्थानकालगतच्या आनंदनगर झोपडपट्टीत 25 जणांना कोरोनाची लागण झाली,  तर पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात 36 रुग्णांची भर पडली आहे. तेथील एकूण रुग्णांची संख्या 457 झाली आहे. दोन्ही शहरांतील विविध रुग्णालयांत उपचार घेऊन कोरोनामुक्तस झालेल्या 160 रुग्णांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या 2 हजार 279 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यापैकी 176 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 140 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 2 हजार 875 एवढी झाली आहे. मंगळवारी नऊ रुग्ण मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली असून, एकूण मृतांची संख्या 273 झाली आहे. पुणे शहरात मंगळवारी तब्बल दोन हजार 44 नागरिकांचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. तर आतापर्यंत 43 हजार 907 संशयित नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यात पाच हजार 427 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

पुणे शहरात दाट लोकवस्ती असलेल्या भागात, तसेच झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आता पिंपरी-चिंचवडमधीलही झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी 36 कोरोनाग्रस्तांची भर पडली. त्यातील 25 रुग्ण चिंचवड स्टेशन परिसरातील आनंदनगर झोपडपट्टीतील असून, येथील एकूण रुग्णांची संख्या 170 झाली आहे. तर महापालिका क्षेत्रातील आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 457 वर पोहोचली आहे. चर्हो्ली येथील तीन रुग्ण कोरोनामुक्तझ झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

पुणे शहरात मंगळवारी नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात पाच पुरुष व चार महिला रुग्णांचा समावेश आहे. येरवड्यातील महिलेचा (30) समावेश आहे. रामटेकडीतील पुरुष (52), येरवड्यातील पुरुष (41), पर्वतीतील पुरुष (82), कॅम्प परिसरातील महिला (48), हडपसरमधील 52 व 67 वर्षीय महिला, तसेच नान पेठेतील 76 व 48 वर्षीय पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे. या सर्व रुग्णांना कोरोनासह इतर आजार होते, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

एसआरपीएफच्या २० जवानांना कोरोना

मुंबई घाटकोपर परिसरातून बंदोबस्त करून आलेल्या रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) ग्रुप दोन कंपनीतील 20 पोलिस कर्मचार्यांीना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्या चाचण्या केल्या असता, 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या संपर्कातील इतर पोलिसांना क्वा रंटाईन करण्यात आले आहे. अद्याप 33 पोलिसांचे अहवाल येणे बाकी आहे, अशी माहिती ग्रुप दोनचे सहायक समादेशक लक्ष्मण उत्तेकर यांनी दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
भारतीय क्रिकेट टीम मधील ‘या’खेळाडूंनी आत्तापर्यंत एकही चेंडू खेळला नाही!

भारतीय क्रिकेट टीम मधील 'या'खेळाडूंनी आत्तापर्यंत एकही चेंडू खेळला नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

July 30, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा