mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तो पुन्हा येणार पुन्हा येणार! राज्यात काही ‘या’ जिल्ह्यांमध्ये ४८ तासांत पावसाची शक्यता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 19, 2020
in राज्य
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यातील सर्वच भागांत रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.

कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी १९ आणि २० नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. खरंतर, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली पण १२ नोव्हेंबरपासून थंडी गायब झाली.

यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत असून गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सद्य:स्थितीत सर्वत्र रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. परिणामी थंडी गायब झाली आहे.

राज्यात ८ ते १३ अंश सेल्सिअसदरम्यान खाली आलेला पारा आता १७ ते २० अंशांपर्यंत वाढला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्राच्या दक्षिण-पश्चिम आणि पूर्व भागात सध्या वाऱ्यांची चक्रीय स्थिती असून, कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे.

या पट्टय़ाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि त्यानंतर विदर्भ मराठवाडय़ासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

दिवाळीपूर्वी राज्याच्या सर्वच भागांतील रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाल्याने थंडीचा कडाका जाणवत होता. पुण्यासह, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली.

त्यामुळे या शहरांमधील थंडी गायब झाली असून ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे. पुढील दोन दिवस शहर परिसरात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तर यावेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी. वेळीच तो कोरड्या जागी नेऊन ठेवावा अशा सूचना हवामान खात्याकडून करण्यात आल्या आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अवकाळी पाऊस

संबंधित बातम्या

विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा वाचाच; वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही पंचक्रोशीतून होतंय प्रचंड कौतुक

June 1, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगेंनी लढाई जिंकली, उपोषण सोडलं; सरकारकडून मागण्या मान्य; अंतरवालीत मध्यरात्री काय घडलं?

May 31, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार; ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय

May 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मेहनत विद्यार्थ्यांची, मलिदा चोरांचा! NEET पेपरफुटीच्या टेन्शनमुळे १९ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

May 30, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

May 29, 2026
Next Post
कोल्हापूर जिल्ह्यातील सुपुत्र ऋषीकेश जोंधळे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद

Breaking! दहशतवाद्यांचा पुलवामात ग्रेनेड हल्ला; १२ नागरिक जखमी

ताज्या बातम्या

बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 1, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..