mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जिल्ह्यात भरणेमामा विरोधात जनभावना पेटू लागली;  राष्ट्रवादी पालकमंत्र्यांना हटवणार, की आमचंच खरं म्हणत आपले घोडे दामटवणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 6, 2021
in सोलापूर, राज्य
सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व इंदापूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्‍यासाठी जलनायक ठरले आहेत. इंदापूरसाठी जलनायक ठरत असलेले दत्तात्रय भरणे सोलापूरसाठी पालकमंत्री म्हणून खलनायक ठरू लागले आहेत.

कोरोनाचे संकट परतवून लावण्यात अत्यंत निष्क्रिय ठरलेल्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माथी आता सोलापूर जिल्ह्याच्या पाणीचोरीचा शिक्का बसला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात जनभावना पेटू लागली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आता तरी या भावनेचा विचार करून पालकमंत्र्यांना हटवणार, की आमचंच खरं म्हणत आपले घोडे दामटवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्ह्याला आजपर्यंत अनेक मंत्री व पालकमंत्री मिळाले. कोणत्या मंत्र्याच्या काळात सोलापूर जिल्ह्याला काय मिळाले? याची आठवण व लेखाजोखा काढला जातो. या मंत्र्यांच्या काळात सोलापूरचा हा प्रश्न मार्गी लागला, त्या मंत्र्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी कष्ट घेतले… अशी अनेक उदाहरणे सांगितली जातात.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बाबतीत मात्र सोलापूरकरांना वेगळाच अनुभव आला आहे. पालकमंत्री भरणे यांच्या काळात सोलापूरला काय मिळाले? यापेक्षाही सोलापूरकरांच्या वाट्याचे हक्काचे पाच टीएमसी पाणी पालकमंत्री भरणे यांनी त्यांच्या तालुक्‍यासाठी पळविले, हा आरोप पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना आयुष्यभर सहन करावा लागणार आहे.

ज्या ज्या वेळी सोलापूरच्या पालकमंत्री पदाचा आणि दत्तात्रय भरणे यांचा भविष्यात विषय निघेल त्या वेळेस पाणी चोरीचा हा शिक्का कायम स्मरणात राहील.

सोलापूर शहर व जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून ठोस उपाययोजना अपेक्षित होती. रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन, कोरोना लसीचा पुरेसा साठा, रुग्णांना ऑक्‍सिजन बेड या तीन महत्त्वाच्या गोष्टी मिळवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना सध्या पदोपदी झगडावे लागत आहे.

यातील कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. रुग्णाचे नातेवाईक अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासह अनेकांच्या हातापाया पडून या गोष्टी मिळवत आहेत.

स्वाभिमानी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांवर अशी लाचारीची वाईट वेळ आली आहे. याचा थोडा तरी विचार पालकमंत्री भरणे करतील का?, गेल्या वर्ष- सव्वा वर्षाच्या काळामध्ये पालकमंत्री भरणे यांनी सोलापूर साठी काय केले, हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.

भीमा नदी ओलांडल्यानंतर शेजारच्या इंदापूर तालुक्‍यातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी येतात. दुपारी आलेले पालकमंत्री सायंकाळी पुन्हा आपल्या घरी सुखरूप जातात.

नववधू ज्याप्रमाणे येती- जातीचा कार्यक्रम करण्यासाठी माहेरी येते आणि पुन्हा सासरी निघून जाते त्या पद्धतीनेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूरचा दौरा करतात आणि निघून जातात. या दौऱ्यातून काय साध्य होते,

या प्रश्नाचे उत्तर ना सर्वसामान्यांना मिळाले ना जिल्हा प्रशासनाला मिळाले आहे. सोलापूर शहर व जिल्हा कोरोनाच्या भीषण संकटाचा सामना करत असताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात तळ ठोकून राहणे अपेक्षित होते. सध्या मात्र तसे घडताना दिसत नाही.

सोलापूरला राष्ट्रवादीपेक्षा भाजप वाटू लागली जवळची

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर मनापासून प्रेम करणारा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा आणि शरद पवारांच्या मर्जीतल्या जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, अशीच आजपर्यंतची सोलापूर जिल्ह्याची ओळख होती. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक भावना व स्थानिक प्रश्न याचा कसलाही विचार न करता राष्ट्रवादी कॉंग्रेस सोलापूरच्या बाबतीत परस्पर निर्णय घेऊ लागल्याने सोलापूर जिल्ह्याचा कल आता बदलत आहे.

एकेकाळी राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून ओळख असलेला सोलापूर जिल्हा आता भाजपकडे झुकू लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या तब्बल 11 पैकी सहा जागा या भाजपकडे आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहरानंतर आता सोलापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष दिले आहे.

शरद पवार आणि सोलापूर यांच्यातील नाते जुन्या पिढीने पाहिले आहे. नव्या पिढीला सोलापूर आणि फडणवीस यांच्यातील नव्या नात्याची विश्वासार्हता अधिक वाटू लागली आहे.

सोलापूर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात विश्वासाचे आणि विकासाचे नवीन नाते तयार होऊ लागले आहे. हेच नाते भविष्यात राष्ट्रवादीला प्रचंड अडचणीचे ठरण्याची शक्‍यता आहे.(स्रोत : सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पालकमंत्री दत्तात्रय भरणेसोलापूर

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

तळणीनंतर खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान! खाद्य तेलाबद्दल तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ‘हा’ नियम न पाळल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षा; विक्रेत्यांना गंभीर इशारा

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

आनंदवार्ता! ‘या’ वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

August 20, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

मोठी बातमी! ​सात वर्षांखालील शिक्षेच्या गुन्ह्यात आधी नोटीस बंधनकारक; कोल्हापूर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

August 19, 2026
Next Post

भाजप मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते, ठाकरे सरकार का देत नाही? आरक्षण रद्द केल्याप्रकरणी भाजपचे ठिय्या आंदोलन

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 22, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

तळणीनंतर खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान! खाद्य तेलाबद्दल तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ‘हा’ नियम न पाळल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षा; विक्रेत्यांना गंभीर इशारा

August 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..