टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढयानजीक असणाऱ्या शांतीनगर येथील पृथ्वीराज रविंद्र लोकरे (वय.१९) या युवकाने अज्ञात कारणावरून राहते घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , पृथ्वीराज रविंद्र लोकरे याने ३ जुलै रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.३० च्या सुमारास राहते घरी कोणत्या तरी अज्ञात कारणाने स्लॅबच्या छताच्या हुकाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
याची खबर मयत युवकाचे चुलते सिध्दार्थ रावसाहेब लोकरे यांनी मंगळवेढा पोलिसात दिली असून अधिक तपास पो ना.तळवार हे करीत आहेत.
दरम्यान मयत पृथ्वीराज चे वडील हे प्राथमिक शिक्षक असून पृथ्वीराज याने आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत.
सिध्देश्वर कारखान्याच्या चिमणीबाबत बैठक , जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी
कुमठे येथील सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या त्या चिमणीबाबत दि.५ जुलै रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे.
दि नॅशनल ग्रीन ट्रीब्युनल प्रिंसीपल बेंच नवी दिल्ली यांनी दिलेल्या आदेशानुसार ही बैठक होत असून, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ सोलापूर , जिल्हा दंडाधिकारी यांची संयुक्त समिती करुन या प्रकरणाची सुनावणी करुन पुढील दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानूसार ही सुनावणी होणार आहे. कारखान्याने उभारलेल्या चिमणीमुळे जर पर्यावरणीय नियम रांचे उल्लघंन होत असेल व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ सोलापूर यांनी उपाय योजना कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज