mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोदी सकारात्मक! मतदारसंघाच्या विकासासाठी आ.आवताडे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; कायापालट होणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 9, 2022
in मंगळवेढा
मोदी सकारात्मक! मतदारसंघाच्या विकासासाठी आ.आवताडे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; कायापालट होणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भारताची दक्षिण काशी म्हणून लौकिक असणाऱ्या पंढरपूर शहरामध्ये वारीनिमित्त लाखो वारकरी भाविक पंढरीत दाखल होतात. सांप्रदायिक आणि अध्यात्मिक राजधानी असणाऱ्या पंढरपूर मध्ये येणारा वैष्णवांचा मेळा चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी जमा होतात.

पंढरपूर नगरीच्या जलतीर्थ आख्यायिकेची परंपरा जतन करणारी चंद्रभागा नदी गेल्या अनेक दिवसांपासून प्रदूषण आणि घाणीचे साम्राज्य यांच्या कचाट्यात सापडली असल्याचे दिसून येत आहे.

वारकरी भक्तांच्या विठ्ठल आराधनेची साक्ष देणाऱ्या चंद्रभागा नदीचा नमामी गंगा नदीच्या धर्तीवर कायापालट करावा अशी मागणी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आ.समाधान आवताडे यांनी केंद्रीय मंत्री यांच्या नवी दिल्ली येथे भेटी घेतल्या.

दिल्ली दौऱ्यामध्ये आ. समाधान आवताडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे – पाटील यांच्या भेटी घेतल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना समस्त पंढरपूर वासियांच्या वतीने पंढरपूर भेटीचे निमंत्रण आ. समाधान आवताडे यांनी दिले.

चंद्रभागा नदीचे पावित्र्य जपण्यासाठी व होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांनी ननामी चंद्रभागा प्राधिकरण स्थापना केली होती.

सदर प्राधिकरण अंतर्गत नदीला जोडणाऱ्या प्रदूषण मार्गाला प्रतिबंध करणे, उपलब्ध पाणी स्रोत यांचे शुद्धीकरण करणे, नदी पात्राच्या दोन्ही किनाऱ्यावर वृक्ष लागवड करणे, नदी किनाऱ्यांचे सौंदर्ययीकरण करणे,

पंढरपूर वारीनिमित्त येणाऱ्या वारकरी भक्तांच्या आरोग्य सेवेसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करणे, शौचालय निर्मिती करणे आदी सुविधा या बाबींचा विकास करणे हे या प्राधिकरणाचे मुख्य उद्दिष्ट होते.

परंतु या प्राधिकरणाची स्थापना झाल्यापासून यामध्ये कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सदर प्राधिकरण स्थापना अनुषंगाने याबाबत अजून एकही बैठक झालेली नाही. ननामी चंद्रभागा या योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.

चंद्रभागा नदीचा नमामी गंगा नदीच्या धर्तीवर विकास झाल्यास वरील समस्या कमी होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रतिनिधित्व करत असलेल्या लोकसभा मतदारसंघातील  वाराणसी शहराचा झालेला तेजोमय कायापालट खूप आदर्शवत आणि नेत्रदीपक आहे.

अगदी त्याच धर्तीवर परमात्मा विठ्ठल – रुक्मिणी नगरी असणाऱ्या पंढरपूर शहराचा विकास येथील सांप्रदायिक परंपरेला अधोरेखित करेल असेही आ.समाधान आवताडे यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये अनन्यसाधारण महत्व असलेल्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पंढरपूर शहराचाही या योजनेमध्ये समावेश करावा असेही आ.आवताडे यांनी मागणी केली आहे.

आ. समाधान आवताडे यांच्या सर्व मागण्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर तपशील घेऊन पंढरपूर दौऱ्यादरम्यान आपण स्वतः सर्व गोष्टींचा अभ्यास करून नमामी चंद्रभागा संदर्भात विश्वसनीय पाऊल उचलण्याचा शब्द आ.समाधान आवताडे यांना दिला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडेपंतप्रधान नरेंद्र मोदीभेट

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
Next Post
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात हरणाच्या शिकारासाठी वापरण्यात येणारी शस्त्रे जप्त; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा