mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक, हीराबेन यांचं निधन; शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम. आई गेल्यानंतर मोदी यांचं भावूक ट्विट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 30, 2022
in राष्ट्रीय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक, हीराबेन यांचं निधन; शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम. आई गेल्यानंतर मोदी यांचं भावूक ट्विट

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

याच वर्षी 18 जून रोजी हीराबेन यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे.

हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. हीराबेन यांची तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

हीराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांचे प्रधान सचिव के. कैलासनाथन रुग्णालयात गेले होते.

त्यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना भेटून हीराबेन यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. तसेच त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही अहमदाबादला आले होते. त्यांनी आपल्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच आईसोबत थोडावेळ घालवला होता.

हीराबेन यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे हीराबेन यांची प्रकृती अधिकच खालावली. उपचाराला साथ न दिल्याने अखेर त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. आईच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: गांधीनगर येथे येणार असल्याचं वृत्त आहे. मोदी अंत्यसंस्काराला येणार असल्याने गांधी नगरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे.

हीराबेन यांचा जन्म 18 जून 1923मध्ये झाला होता. या वर्षी त्यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. आईच्या वाढदिवसासाठी स्वत: नरेंद्र मोदी गुजरातच्या गांधीनगरला आले होते. त्यांनी आईचे पाय धुवून आशीर्वादही घेतले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सात भाऊ बहीण आहेत. सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, बहीण वासंतीबेन, पंकजभाई मोदी आदी त्यांच्या भाऊ आणि बहिणींची नावे आहेत. त्यात मोदी तिसऱ्या क्रमांकाचे आहेत.

मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी

अहमदाबादमध्ये किराणा दुकान चालवतात. मोदींचे मोठे बंधू सोमभाई आरोग्य विभागात कामाला होते, आता ते निवृत्त झाले आहेत. ते आता अहमदाबादेत एक वृद्धाश्रम चालवतात. तसेच सामाजिक कार्यात व्यस्त असतात.

ADVERTISEMENT

अमरुतभाई यांनी एका खासगी कंपनीत फिटर म्हणून काम केलं आहे. आता तेही निवृत्त झालेले आहेत. मोदी यांचे सर्वात लहान बंधू पंकज मोदी हे गुजरातच्या माहिती विभागात कामाला होते. तेही निवृत्त झाले आहेत. हीराबेन पंकजभाईंसोबतच गांधीनगरला राहत होत्या.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदी
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मोठा झटका! राहुल गांधींना कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

मोठी बातमी! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द; नेमकं काय कारण? कायदा काय सांगतो

March 24, 2023
मोठा झटका! राहुल गांधींना कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

मोठा झटका! राहुल गांधींना कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

March 23, 2023
कष्टाचे चीज केले! जमीन विकून मुलाला केले जिल्हाधिकारी; श्रीकांत खांडेकर यांनी वडिलांना खुर्चीवर बसवून केला सन्मान

कष्टाचे चीज केले! जमीन विकून मुलाला केले जिल्हाधिकारी; श्रीकांत खांडेकर यांनी वडिलांना खुर्चीवर बसवून केला सन्मान

March 18, 2023
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

School Admission : इयत्ता पहिलीच्या प्रवेशाचे वय बदलले, नवं शैक्षणिक धोरण लागू; केंद्र सरकारचे सर्व राज्यांना आदेश

February 23, 2023
बजेटमधून दिलासा! तुम्हाला टॅक्समध्ये 7 लाखांपर्यंत सूट कशी मिळणार? हे समजून घ्या नाहीतर होईल नुकसान

बजेटमधून दिलासा! तुम्हाला टॅक्समध्ये 7 लाखांपर्यंत सूट कशी मिळणार? हे समजून घ्या नाहीतर होईल नुकसान

February 1, 2023
Budget 2022 : अर्थसंकल्पात नेमकं काय स्वस्त, काय महाग?; पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार… जाणून घ्या

देशात काय स्वस्त… काय महाग? सामान्यांवरील करात वाढ होणार का? आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार

February 1, 2023
नवरा पावशेर! जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या वराबाबत धक्‍कादायक माहिती उजेडात

सोलापूर विवाहाची दिल्लीतही चर्चा; खासदाराने थेट संसदेत केली ‘ही’ मागणी

December 17, 2022
सावधान! सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताय; तुमची फसवणूक करण्यासाठी सायबर ठग सज्ज

ऑनलाईन खरेदी करताय, सावधान; 510 रुपयांच्या ड्रेसची ऑफर पडली 3 लाख रुपयांना

December 12, 2022
ठाकरे सरकारला धक्का! मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

ऐतिहासिक निर्णय! आर्थिक दुर्बलांच्या १० टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टानं १०३ वी घटनादुरुस्ती ठरवली वैध

November 7, 2022
Next Post
निर्लज्ज कार्यालय! भूमिअभिलेख कार्यालयासमोर शेतकऱ्याचे नग्न आंदोलन

निर्लज्ज कार्यालय! भूमिअभिलेख कार्यालयासमोर शेतकऱ्याचे नग्न आंदोलन

ताज्या बातम्या

वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मंगळवेढ्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंबाची बाग जळून खाक; डोळ्यादेखत उपजीविकेचे साधन जळत असतांना कुटुंबियांना आश्रु अनावर झाले

March 25, 2023
आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

March 25, 2023
अखेर विसाव्या दिवशी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी झाली ‘यांची’ नियुक्ती

सोलापूरच्या तत्कालीन SP तेजस्वी सातपुते यांच्या कामगिरीची दखल; त्यांच्या ‘या’ उपक्रमाला पंतप्रधान पुरस्कार जाहीर

March 25, 2023
आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ शुगर लवंगी येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कौतुकास्पद! आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत, प्रा.शिवाजीराव सावंत बंधुंनी घेतलेल्या महाआरोग्य शिबीराची इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

March 25, 2023
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

March 25, 2023
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

सावधान! ‘सेलिब्रिटीज’ला फॉलो केला तर पैसे मिळतील असे सांगून चौघांनी केली फसवणूक

March 25, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा