mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात आरोग्य विभागाचा प्रताप! मृत व्यक्तीच्या नावावर कोरोनाचा दुसरा डोस; नातेवाइकांमध्ये संताप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 27, 2021
in सोलापूर, राज्य
संतापजनक! मंगळवेढ्यात कोरोनाग्रस्तांची हॉस्पिटलकडून लूट; बिलाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी

टीम मंगळवेढा टाइम्स ।

कोविड लस ही कोरोना आजाराविरुद्ध रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी दिली जाणारी लस आहे. मात्र, वैराग (ता. बार्शी) येथे चक्क मृत व्यक्तीच्या नावावर कोरोनाच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण झाल्याची नोंद झाली आहे.

आरोग्य खात्याने मृत व्यक्तीला लस देऊन अप्रत्यक्षरीत्या जिवंतच दाखविले आहे. या प्रकारामुळे मृताच्या नातेवाइकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

येथील यशोदा बाबासाहेब धावारे (वय 62) यांनी 12 मार्च 2021 रोजी वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा पहिला डोस घेतला.

मात्र त्यांचे 25 जून 2021 रोजी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. निधनानंतर तब्बल 111 व्या दिवशी म्हणजे 19 ऑक्‍टोबर 2021 रोजी लसीचा दुसरा डोस दिल्याचा अधिकृत संदेश नातेवाइकाच्या मोबाईलवर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीला दुसरा डोस देण्याचा प्रताप आरोग्य विभागाने केला आहे. संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाइकांमधून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृताच्या नावे बोगस व गैरकृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

आमच्या माणसाचा आम्ही आपल्या हाताने अंत्यविधी केला; तरीही त्यांनी लस कशी घेतली, असा प्रश्न नातेवाइकांकडून विचारला जात असून, आरोग्य विभागाच्या या प्रकारामुळे नातेवाइकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

मृत व्यक्तीच्या नावावर लसीकरण नोंदणी कोणी केली? नोंदणी करून ती लस नेमकी कोणाला दिली? उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तर मृत व्यक्तीच्या नावावर लसीकरण उरकले जात नाही ना? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण केले जात आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर

संबंधित बातम्या

धक्कादायक! घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्….; नेमकं काय घडलं?

May 14, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! भोंदू खरातशी संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर ३ दिवस सोबतच गुवाहाटीमध्ये; हॉटेलच्या डिटेल्स समोर

May 14, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! ‘या’ लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का

May 12, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेत मोजणीचा साडेसाती सुटणार! आता ‘इतक्या’ दिवसांत मोजणी अन् ३ दिवसांत फाईल निकाली; महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश

May 11, 2026

कामाची बातमी! राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

May 11, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! शेतीच्या कारणावरून मुलाचा वडिलांवर चाकूने हल्ला; वडिलांची मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

May 10, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावात पाणी नाही, मजुरांना पैसे नाही! ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभार ठप्प; कोर्टाच्या आदेशामुळे सरपंच अडचणीत; ग्रामीण भागात संतापाचा उद्रेक

May 10, 2026
शेतकऱ्यांना मोठा आधार! सोलापुरात कांद्याला मिळाला प्रति क्विंटल ‘एवढया’ हजारांचा भाव

​कांदा रडवतोय! ५० पैसे किलो भाव; ७३ पिशव्या कांदा विकून खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या पदरात उरली चहा-पाण्याइतकीच रक्कम; बळीराजा’चे डोळे पाणावले

May 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत ‘या’ विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास

May 9, 2026
Next Post
धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! मंगळवेढ्यात अल्पवयीन मतिमंद मुलीचा विनयभंग

ताज्या बातम्या

धक्कादायक! घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्….; नेमकं काय घडलं?

May 14, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

इंधन बचतीसाठी सभापतींचा पुढाकार! दीपाली ताड आता ‘लालपरी’ने करणार प्रवास

May 14, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! भोंदू खरातशी संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर ३ दिवस सोबतच गुवाहाटीमध्ये; हॉटेलच्या डिटेल्स समोर

May 14, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

काय चाललंय मंगळवेढ्यात? पंचायत समितीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

May 12, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! ‘या’ लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का

May 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा