टीम मंगळवेढा टाईम्स । गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली इंडो – तिबेट बॉर्डर पोलिस दलाची सीमावर्ती पोस्ट याच वर्षीच्या अखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहे.आता कितीही प्रतिकूल वातावरणात टिकाव धरण्याची या पोस्टची क्षमता आहे. Post in Ladakh operational by the end of the year
चीनच्या सीमेला लागून असलेल्या लडाखम धील बर्फाच्छदित अशा पेनगाँग त्सो सरोवर परिसरात असलेल्या लुकुंग येथे आयटीबीपीचे हे तळ आहे . सध्या याच परिसरात भारत आणि चीनचे सैनिक समोरासमोर आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
भारताचा महत्त्वाकांक्षी धोरणात्मक प्रकल्प म्हणून या पोस्टची ओळख आहे . तापमान शून्याच्या खाली असतानाही , या पोस्टच्या माध्यम तून आयटीबीपीच्या जवानांना परिसरातील कोणत्याही भागात तैनात करणे आणि त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करणे शक्य आहे.केवळ कडाक्याच्या थंडीतच नव्हे ,तर अन्य कोणत्याही वातावरणाचा या पोस्टवर कुठलाच परिणाम होणार नाही , अशी रचना करण्यात आली असल्याची माहिती या दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
ही पोस्ट म्हणजे , एक इमारतच असून , तिचे संपूर्ण बांधकाम काँक्रिटने करण्यात आले आहे . आता तिथे वातावरण नियंत्रण उपकरणे आणि दारुगोळा साठविण्यासाठी भूमिगत जागा तयार करण्यात येत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज