टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा आरक्षणाचा मुद्दा आता राज्यात तापू लागला आहे. अनेक जिल्ह्यात, गावांत राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केली आहे.
यातच मंगळवेढा तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांचं सत्र सुरू झालं आहे.
मंगळवेढा तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजासाठी राजीनामे दिले आहेत. अलिकडेच राजकीय नेत्यांना मंगळवेढ्यात येण्यास बंदी घातली होती. तर आज सर्वपक्षीय नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये. शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि काॅंग्रेसच्या नेत्यांचा समावेश आहे.
टिकणारं आरक्षण पाहिजे असेल तर सरकारला वेळ दिला पाहिजे. अशी मागणी मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने केली आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने दामाजी चौकात सुरू असलेला साखळी उपोषणाचा लढा अधिक तीव्र झाला.
आज सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत यामध्ये मनसे जिल्हा समन्वयक नारायण गोवे, शहराध्यक्ष दत्तात्रेय हजारे, काँग्रेसचे मारुती वाकडे, शहराध्यक्ष राजाभाऊ चेळेकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, प्रहार संघटना तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुल घुले, मनसे तालुका उपाध्यक्ष देवदत्त पवार, वाहतूक सेना शहराध्यक्ष कृष्णा ओमने, शंकर गांडुळे,युवराज चौगुले, राजेंद्र सावंत, सिद्धेश्वर पाटील तसेच विविध ग्रामपंचायतीने मराठा आरक्षणाला पाठिंब्याचे पत्र व सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज