मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
अर्ज चौकशीवरुन भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यामधून आरोपीची नावे कमी करण्यासाठी दहा लाखाची मागणी करुन पहिला हप्ता पाच लाख स्विकारताना लाचलुचपत सांगली विभागाने रंगेहाथ पकडलेल्या पोलीस हवालदार महेश कोळी,
पोलीस अंमलदार वैभव घायाळ या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत काल मंगळवारी संपत असल्याने त्यांना पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता पुन्हा दोन दिवसाच्या पोलीस कोठडीची वाढ न्यायालयाने केली आहे.
या घटनेची हकीकत अशी, वरील दोघा आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून तक्रारी अर्ज चौकशीवरुन भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यातून आरोपीची नावे कमी करण्यासाठी
दहा लाखाची मागणी करुन पहिला हप्ता पाच लाखाचा माचणूर येथील श्री सिध्देश्वर माचणूर परिसरात लाचलुचपत विभाग सांगली यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.
याचा तपास सोलापूर लाचलुचपत विभागाचे डी.वाय.एस.पी. गणेश कुंभार हे करत असून मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्या दोघांना पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात काल दुपारी उभे केल्यावर दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान आरोपी व्यक्तीकडून दहा लाख लाचेची मागणी केल्याने या प्रकरणाला मोठे गांभीर्य निर्माण झाले आहे. कोणा कोणावर कारवाई होणार? का त्यांना बगल मिळणार याकडे संपूर्ण तालुकावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. त्या दिशेने तपास होणे त्या दृष्टीने महत्वाचे आहे.
या लाच प्रकरणामुळे सोलापूर जिल्हयात मंगळवेढा पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असून ही प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी भविष्यात पोलीसांना सावधानतेने पावले टाकण्याची गरज सुजाण नागरिकामधून व्यक्त होत आहे.
लाच प्रकरणाची घटना घडल्यापासून मंगळवेढा पोलीस ठाण्यात कमालीची शांतता पसरली आहे. अजून काही कर्मचारी येथील टार्गेट असल्याची चर्चाही परिसरात ऐकावयास मिळत आहे.
दोन वेळा बोराळे बीट मधील कर्मचारीच लाच प्रकरणात अडकल्याने बोराळे बीटकडे पाहण्याचा दृष्टीकोन नागरिकांचा बदलला आहे. मंगळवारी दुपारी तपासाधिकारी मंगळवेढ्यात दाखल झाल्यानंतर दिवसभर उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज