mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Good news : सोलापुरातील मंगल कार्यालयांत लग्न समारंभास परवानगी ; ‘या’ अटी पाळाव्या लागणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
Good news : सोलापुरातील मंगल कार्यालयांत लग्न समारंभास परवानगी ; ‘या’ अटी पाळाव्या लागणार

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्यातील खुले लॉन, विनावातानुकुलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह आणि घर व घराच्या परिसरात अटी शर्तींच्या अधिन राहून लग्न समारंभास परवानगी देण्यात आली आहे.याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आदेश जारी केले आहेत.  Permission for wedding ceremony at Mangal office in Solapur

या आदेशात त्यांनी नमूद केलेल्या अटी पुढीलप्रमाणे –

लग्न समारंभाच्या ठिकाणी एकावेळी मंगल कार्यालयामधील कर्मचारी, उपस्थित सर्व व्यक्ती, बँन्ड /वादक, भटजी, डेकॉरेटर व इतर यांच्यासह एकूण संख्या 50 पेक्षा जास्त असणार नाही.  मास्क आणि सुरक्षित अंतराचे (social Distancing) पालन करणे बंधनकारक राहील. लग्न समारंभाच्या प्रवेशापूर्वी हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे, थर्मल स्क्रिनिंगद्वारे प्रत्येक व्यक्तीची तपासणी करुनच प्रवेश देणे आवश्यक राहील.

मंगल कार्यालयामध्ये एअर कंडीशनचा वापर करू नये, मंगल कार्यालयात सर्व बाजूने हवा खेळती राहील अशी व्यवस्था करावी. मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तु / ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत निर्जंतुकीकरण करावे.लग्नसमारंभ सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00या कालावधीतच आयोजित करावा.कोणतीही आजारी व्यक्ती लग्न समारंभास येणार नाही.

लग्नसमारंभाच्या ठिकाणी 55 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, रक्तदाब आणि इतर आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर माता व दहा वर्षांखालील मुलांचा प्रवेश टाळावा. लग्न समारंभासाठी संबंधित तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. लग्न समारंभाच्या सात दिवस अगोदर पूर्वपरवानगी अर्ज व लग्न समारंभासाठी येणाऱ्या लोकांचे मोबाईल क्रमांक व पत्ते नमूद करून यादी जमा करणे आवश्यक राहील.

कार्यक्रमाच्या ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करण्यात यावा. मंगल कार्यालय अथवा विवाहस्थळ प्रतिबंधीत क्षेत्रात येत असल्यास विवाह सोहळा आयोजित करता येणार नाही.

वरील अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालयाचे परवाने रद्द करण्याची कार्यवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. याबाबत देखरेखीसाठी पथके नियुक्त केली जाणार आहेत त्यांची रचना पुढीलप्रमाणे असेल. 

नगरपालिका हद्द:- नगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके स्थापन करावीत

गावपातळीवर:- ग्रामपंचायत व पोलीस विभागाची संयुक्त पथके स्थापन करावीत.

पथकाबाबत संबधित उपविभागीय अधिकारी यांची संनियंत्रणाची जबाबदारी असेल. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती किंवा संस्था भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51,55 तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार  कारवाईस पात्र असेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
राज्यातील आशा सेविकांसाठी खुशखबर, ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

राज्यातील आशा सेविकांसाठी खुशखबर, ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा