मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
प्रत्येक गावात सामूहिक श्रमदानातून पाणलोट चळवळ निर्माण व्हावी या उद्देशातून केंद्र सरकारने राज्यातील ३० जिल्ह्यात पाणलोट यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कुडूवाडी, माढा, मंगळवेढा तसेच सांगोला या चार तालुक्यात लवकरच पाणलोट यात्रा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
या यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली
यावेळी सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमोल जाधव, जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद एस. एस. पारशे,
उपविभागीय अधिकारी भीमा पाटबंधारे विभाग एस. डी. हलकुडे, प्रकल्प संचालक नेहरू युवा केंद्र अनिल हिंगे, उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वाय.चौधरी, उपकार्यकारी अधिकारी सोलापूर पाटबंधारे विभाग ओ. बी. थंबद, प्रांत अधिकारी माढा पी.व्ही. आंबेकर आदी उपस्थित होते
पाणलोट कामांवर श्रमदान अपेक्षित
■ सर्व यंत्रणांना एकत्र येऊन गावोगावी पाणलोट चळवळ निर्माण व्हावी, या अनुषंगाने नवीन मृद व जलसंधारण कामांचे भूमिपूजन करणे, पाणलोट कामांवर श्रमदान करणे, पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करणे,
पाणलोट योद्धे निवडणे इत्यादी कामांचे सूक्ष्म नियोजन करून या उपक्रमांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, बचत गटातील महिला, स्वयंसेवी संस्था व शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज