टीम मंगळवेढा टाईम्स।
ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांतील विकास कामाकरिता १ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडे आ.समाधान आवताडे यांनी सदर निधीची मागणी करून त्यासंबंधी पाठपुरावा केला होता.
सन २०२१ – २२ या अर्थिक वर्षातील तरतुदीद्वारे आ.आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबुतीकरणासाठी व रस्ते दुरुस्तीकरणासाठी आ.आवताडे नेहमीच तत्पर आहेत.
त्या दृष्टीने त्यांनी या शासकीय विभागाकडे मागणी करून सदर भरीव निधीमुळे मतदार संघातील विकास कामे मार्गी लागणार आहेत.
दरम्यान, आ.आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांना ५ कोटी निधी आणल्यानंतर अगदी दोनच दिवसांमध्ये ग्रामीण भागातील विकास कामांना निधी उपलब्ध करून दिल्याने आ. समाधान आवताडे यांच्या कार्याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
मंगळवेढा तालुक्यासाठी गावांना मंजूर झालेली कामे
मौजे रहाटेवाडी येथील हनुमान मंदिर ते जि. प. शाळा रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख, मौजे मुंढेवाडी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालय ते घोडके वस्ती रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ५ लाख,
मौजे कर्जाळ येथील कर्जाळ ते गैबीपीर मंदिर रस्ता मुरुमीकरण खडीकरण करणे ५ लाख, मौजे कर्जाळ येथील कर्जाळ गैबीपीर मंदिर रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ३ लाख,
मौजे कात्राळ येथील हायवे ते कारंडे वस्ती रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ३ लाख,
मौजे चोखामेळा नगर येथील धनाजी खवतोडे ते सोमनाथ बुरजे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, मौजे डोंगरगाव येथील डोंगरगाव ते हाजापूर शिव रस्ता मुरुमीकरण खडीकरण करणे ४ लाख,
मौजे डोंगरगाव येथील डोंगरगाव ते खोमनाळ रस्ता शेंबडे वस्ती, पठाण वस्ती, चव्हाण वस्ती, मोरे वस्ती मार्गे जाणारा रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, मौजे डोणज येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे २ लाख,
मौजे अरळी येथील स्मशानभूमी बंधारा रस्त्यावरील सर्व रस्ते मुरमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, मौजे खवे येथील बिस्टाव्वा देवी ते मारुती मंदिर कॉंक्रिटीकरण करणे ३ लाख, मौजे आंधळगाव येथील आंधळगाव ते गोणेवाडी रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ५ लाख,
मौजे आंधळगाव येथील जिल्हा परिषद शाळा ते काळंबादेवी मंदिर गटार करणे २ लाख, मौजे मुंढेवाढी येथील बिस्किटे वस्ती रस्ता उत्तम कांबळे घर ते भोंगळे वस्ती रस्ता मुरुमीकरण खडीकरण करणे ४ लाख या कामांना निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरवात होईल असी माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली आहे.
पंढरपूर तालुक्यासाठी गावांना मंजूर झालेली कामे –
रांझणी ते एकलासपूर रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, मौजे अनवली येथील सिद्धनाथ मंदिर ते शेख वस्ती मुरूमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, मौजे गोपाळपूर येथील इंदिरा कॉलनी अंतर्गत गटार बांधणे ७ लाख, मौजे कोर्टी येथील महादेव ननवरे वस्ती ते सुभाष काळे वस्ती रस्ता मुरूमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, मौजे गादेगांव येथील लक्ष्मीनगर ते सोनके शिव खडीकरण करणे ४ लाख, मौजे कौठाळी येथील जयराम वस्ती ते बंधारा रस्ता खडीकरण करणे १० लाख, मौजे शिरढोण येथील सब स्टेशन ते चांगदेव व्हळगर वस्ती रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, मौजे खर्डी येथील चव्हाण वस्ती रामोशी मळा ते शिरभावी रस्ता मुरूमीकरण व खडीकरण करणे १० लाख मंजूर झाले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज