बाळासाहेब झिंजुरटे । दारूच्या नशेत एकाने अँगलला शर्टाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गळवेवाडी ता . सांगोला येथे घडली. विलास आत्माराम गळवे वय ४० असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.( One commits suicide by hanging in Sangola )
१४ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास दारूच्या नशेत विलास आत्माराम गळवे रा.गळवेवाडी याने घरातील अँगलला शर्टाने गळफास घेतला.
त्यास सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . याबाबत अंकुश गळवे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज