मंगळवेढा टाईम्स टीम । पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील पोलिस ठाण्याच्या वतीने गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. खुनाचा प्रयत्न करणे , जबरी चोरी व मालमत्तेचे नुकसान करणे आदी प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या
बालाजी हणमंत पवार (वय २५ , रा .खेडभोसे ता. पंढरपूर) यास सहा महिने तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर यांना दिले आहेत, अशी माहिती प्रशांत पाटील यांनी दिली. Pandharpur karkamb Accused of attempted murder deported
याशिवाय आणखी काही सराईत गुन्हेगारांची यादी वरिष्ठांकडे दिली असून त्यांच्याही हद्दपारीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे करकंब पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज