टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील ऐका गावात 55 वर्षीय व्यक्तीने अज्ञात कारणावरून शेतातील चिंचेच्या झाडास नायलॉनच्या रस्सीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून
त्याची आकस्मात मयत अशी पोलिसांत नोंद झाली आहे. दरम्यान,महादेव शामराव पुजारी असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील खबर देणारे शामराव पुजारी हे दि.3 रोजी रात्री हुन्नूर गावामध्ये धार्मिक कार्यक्रम असल्याने ते कार्यक्रमासाठी गेले होते. तर घरातील सर्वजण जेवण करून झोपण्याच्या तयारीत होते.
धार्मिक कार्यक्रम संपल्यानंतर रात्री 11.00 वा. खबर देणारे हे घरी परतल्यानंतर हॉलमध्ये लाईट बंद होती. व वडील झोपलेल्या ठिकाणी आहेत का ते खबर देणार्यांनी पाहिलेले नव्हते.
सकाळी 5.30 वा. ते उठले व वडील झोपलेल्या ठिकाणी त्यांना दिसून आले नाहीत.त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत.
सकाळी 6.00 वा.शेतात आहेत का हे पाहण्यासाठी गेल्यावर शेतातील बांधावरील चिंचेच्या झाडास नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून ते लटकत असल्याचे मयताच्या मुलास दिसून आले असल्याचे दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज