टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायती सह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील १०९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम दहा दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर १५९ गावांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आजी-माजी आमदारांसह – स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. गावचे सत्ताकेंद्र आपल्या ताब्यात राहावे यासाठी नेतेमंडळींना जीवाचे रान करावे लागणार आहे.
जनता आता सत्ताधाऱ्यांना गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा जाब विचारणार आहे. थेट लोकांशी संपर्कात राहण्यासाठी ग्रामपंचायत हे मोठे माध्यम आहे. गावची सत्ता मिळविण्यासाठी अनेकांची धडपड असते.
जिल्ह्यातील अनेक मोठ्या ग्रामपंचायतींच्या सत्तेवरून त्या तालुक्याच्या आमदारांचे राजकीय भवितव्य ठरत असते. सत्ताकेंद्रे मिळवण्याची धडपड स्थानिक नेत्यांची असते तेवढीच तालुक्याच्या आमदारांचीही. त्यामुळे गेल्या पाच वर्षात सत्ताधारी म्हणून केलेली विकासकामे तसेच लोकांशी असलेला संपर्क याची परीक्षा आता स्थानिक नेत्यांना द्यावी लागणार आहे.
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीसह पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व मिळवण्यासाठी बड्या नेत्यांची दमछाक होणार आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात सक्रिय करण्याची तयारी सुरू झाली आहे.
या गावच्या होतील निवडणुका
मंगळवेढा शिरसी, अकोले, जंगलगी, खडकी, खुपसंगी, जुनोनी, महमदाबाद, बठाण, आंधळगाव, शेलेवाडी, उचेठाण, ब्रम्हपुरी, निंबोणी, मुंढेवाडी, जालीहाळ, नंदूर, चिक्कलगी, भाळवणी, हिवरगाव, रेड्डे, लक्ष्मी दहिवडी, लोणार, मानेवाडी, डिकसळ, पडोळकरवाडी, रेवेवाडी, देगाव.
• अक्कलकोट : दहिटणे, हसापूर, जेऊरवाडी, करजगी, नन्हेगाव, तळेवाड, कुडल, केगाव बु. बिजगेर, केगाव खु. कलकर्जाळ, जकापूर, शावळ, कंटेहाळळी, धारसिंग, म्हैसलगे, रामपूर, इटगे, घुंगरेगाव.
• बार्शी उडेगाव, मुंगशी, अंबाबाईचीवाडी, : चिंचोळी ढेबरेवाडी, घारी. करमाळा . भगतवाडी, जेऊर, राजुरी, चिखलठाण, गौंडरे, उंदरगाव, कंदर, कोर्टी, निंभोरे, केतूर, वीट होईल. रामवाडी, घोटी, रायगाव, कावळवाडी, केम.
माढा पिंपळखुटे आढेगाव, अंजनगाव, अंबाड, वडशिंगे, मुंगशी, लोणी, नाडी, कन्हेरगाव, तुळशी, चांदज, वडोली, टेंभुर्णी, रोपळे, पिंपळनेर. माळशिरस माळीनगर, धर्मपुरी, : कारुडे, वाफेगाव, देशमुखवाडी, कन्हेर, लवंग,कोंढारपट्टा, सातगव्हाण, दहिगाव. .
सांगोला : खवासपूर, सावे, चिकमहुद, वाढेगाव दक्षिण सोलापूर गावडेवाडी, शिरवळ, कासेगाव, वळसंग, कुसूर, दोड्डी, तिल्लेहाळ, औज, उळेवाडी, उळे. मोहोळ . : मलिकपेठ, जामगाव, गुरसाळ, ईश्वरवठार, पुळूजवाडी.
अशी निवडणूक प्रकिया…..
– १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान नामनिर्देशनपत्र मागवण्याची व सादर करण्याची मुदत असेल. २३ ऑक्टोबर रोजी दाखल अर्जांची छाननी
२५ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल उमेदवारी माघारी घेण्याचा शेवट दिवस
-५ नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल.
६ नोव्हेंबरला तहसीलदारांनी नियोजित केलेल्या ठिकाणी मतमोजणी असेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज