mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कारखानदारांचे पुनर्वसन करण्यासाठी पदवीधर मतदारसंघ नाही : नीता ढमालेंची लाड, देशमुखांवर टीका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 29, 2020
in राजकारण
नीता ढमालेंच्या उमेदवारीने बदलतील पुणे पदवीधर मतदार संघाची राजकीय समीकरणे?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पुणे पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होईल, असे चित्र जरी निर्माण केले जात असले, तरी अपक्ष उमेदवार नीता ढमाले यांनी प्रचारात मोठी बाजी मारली आहे. त्यांना मिळणारा प्रतिसादही लक्षणीय आहे.

पदवीधर मतदारसंघ हा कारखानदारांचे राजकारणात पुनर्वसन करण्यासाठी नसून पदवीधरांचे प्रश्न सोडवणारा योग्य प्रतिनिधी विधान परिषदेत पाठवण्यासाठी आहे, ही अपक्ष उमेदवार नीता ढमाले यांची भूमिका तरुण मतदारांना अपील होत असल्याने भाजप-आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

उमेदवार नीता ढमाले यांच्या प्रचारार्थ बार्शी (जि. सोलापूर) तसेच शिरोळ, हातकंणगले येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीधर मेळाव्याला मतदारांनी गर्दी केली होती.

प्रमुख पक्षांच्या उमेदवारांपेक्षा मतदारांमध्ये नीता ढमाले यांचीच अधिक लोकप्रियता असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.पदवीधर मेळाव्यात मतदारांना संबोधित करताना नीता ढमाले म्हणाल्या, “घटनेने राजकीय पक्षांसाठी विधानसभेची रचना केली आहे.

मात्र, विधान परिषदेचा पदवीधर मतदारसंघ हा राजकीय लोकांसाठी नसून पदवीधरांच्या खऱ्या प्रतिनिधींसाठी राखीव आहे. घटनेने पदवीधरांना विशेषाधिकार वापरुन आपला प्रतिनिधी निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने पदवीधरांना त्यांच्या अधिकाराबद्दल जागृत केले नाही. तेच काम करण्यासाठी मी इथे आली आहे.”

पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवार देताना कुठलाही पक्ष किंवा संघटना पदवीधरांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करुन घेत नाही किंवा त्यांचे मत विचारात घेत नाही. जर उमेदवार देतानाही तुम्हाला विचारात घेतले जात नसेल, तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित पक्ष, संघटना कितपत गांभीर्याने काम करतील हा प्रश्न आहे,” असे ढमाले म्हणाल्या.

कुणीही निवडून आले तरी आपल्याला काही फरक पडणार नाही हा गैरसमज सर्वप्रथम दूर करा, असे आवाहन ढमाले यांनी केले. त्या म्हणाल्या,”घटनेने दिलेल्या विशेषाधिकाराचे महत्व ओळखून स्वतःच्या भवितव्यासाठी योग्य उमेदवाराला मत द्या.

राजकीय पक्षांनी थोपवलेला उमेदवार निवडून आपले भवितव्य राजकिय पक्षांच्या हातात जाऊ देऊ नका. पदवीधरांनाही स्वाभिमान आहे, हे दाखवून द्या. जोपर्यंत तुम्ही मतपेटीद्वारे तुमचे अस्तित्व दाखवणार नाही, तोपर्यंत तुमचा वापर केवळ मतदानापुरताच केला जाईल, हे लक्षात घ्या.”

“आजपर्यंत वेगवेगळ्या पक्षांचे लोक पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात गेले, पण त्यांच्या कामाविषयी तुम्ही समाधानी आहात का हा प्रश्न स्वतःला विचारा. तुमचे उत्तर जर “नाही’ असे असेल तर हीच बदल घडवण्याची योग्य वेळ आहे.

आता जर तुम्ही चुकीचा उमेदवार निवडून दिला तर भविष्यात पश्‍चाताप करुन काही उपयोग होणार नाही, त्यासाठी आताच योग्य उमेदवार निवडून द्या. मी तुम्हाला वचन देते की मला जर तुम्ही काम करण्याची संधी दिली, तर तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही,” असा विश्‍वासही त्यांनी या वेळी पदवीधरांना दिला.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Join WhatsApp Group for Latest News

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नीता ढमालेपुणे पदवीधर मतदार संघ

संबंधित बातम्या

Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

मंगळवेढा राष्ट्रवादीत गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बाजूला केले जाणार; कोण म्हणाले,वाचा सविस्तर

January 17, 2021
आश्चर्यकारक कलाटणी! राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात

धनंजय मुंडेंबाबत रात्री उशिरा झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महत्वाचा निर्णय

January 15, 2021
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

उमेदवारांनो सावधान! True Voter App वर दैनंदिन खर्च न भरल्यास आयोगाची होणार कारवाई

January 11, 2021
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शोधला राजकीय वारसदार! बहुजन रयत परिषद’ची जबाबदारी सोपवली कन्येवर

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शोधला राजकीय वारसदार! बहुजन रयत परिषद’ची जबाबदारी सोपवली कन्येवर

January 10, 2021
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

राष्ट्रवादीचा शिवसेनेला फटका! सोलापुरातील ‘हा’ बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

January 7, 2021
सरपंच पदासाठी होतीये रस्सीखेच! ‘या’ प्रवर्गातील जागा अधिकाधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न

ग्रामपंचायत लढती आज स्पष्ट होणार;उमेदवारी अर्ज ‘या’ वेळेपर्यंत माघारी घेता येणार

January 4, 2021
कै.भारत भालके यांच्या वारसदारांनाच उमेदवारी, इतरांनी उमेदवारीची अपेक्षा करु नये : साठे

पोटनिवडणुकीत नानांच्या वारसांनाच उमेदवारी, पार्थच्या उमेदवारीची अफवा पसरवून घाणेरडे राजकारण : बळीराम साठे

December 31, 2020
संत दामाजी कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आ.प्रशांत परिचारक गटाची मोठी घोषणा

संत दामाजी कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आ.प्रशांत परिचारक गटाची मोठी घोषणा

December 30, 2020
सरपंच पदासाठी होतीये रस्सीखेच! ‘या’ प्रवर्गातील जागा अधिकाधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न

ग्रामपंचायत उमेदवारांना दिलासा! उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरता येणार

December 29, 2020
Next Post
दिवाळीसाठीही राज्य सरकारने नियमावली; सण साधेपणाने साजरा करा

आज कार्तिक शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच 'देव दिवाळी'

ताज्या बातम्या

सरपंच पदासाठी होतीये रस्सीखेच! ‘या’ प्रवर्गातील जागा अधिकाधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न

उमेदवारांनो लक्ष द्या! मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी ‘या’ पद्धतीने होणार

January 18, 2021
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

…अन्यथा मंगळवेढा नगरपालिके समोर गाढव मोर्चा काढणार : आदित्य हिंदुस्तानी

January 18, 2021
प्रशांत गायकवाड यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

प्रशांत गायकवाड यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

January 18, 2021
सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कोंडभैरी

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कोंडभैरी

January 18, 2021
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

मंगळवेढा राष्ट्रवादीत गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बाजूला केले जाणार; कोण म्हणाले,वाचा सविस्तर

January 17, 2021
नवा नियम! तुम्ही जर PhonePe, Google Pay, Paytm वापरत असाल तर ‘ही’ बातमी वाचा

सावधान! तुम्हालाही मिळाला आहे का असा मेसेज? गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट

January 17, 2021
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

Join WhatsApp Group for Latest News